ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

टाकळगाव ग्रामपंचायत सरपंच पदी महारुद्र कदम तर उपसरपंचपदी विलास गव्हाणे यांची निवड शिवाजीराव पंडित, अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांनी केले अभिनंदन

टाकळगाव ग्रामपंचायत सरपंच पदी महारुद्र कदम तर उपसरपंचपदी विलास गव्हाणे यांची निवड
शिवाजीराव पंडित, अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांनी केले अभिनंदन
गेवराई, दि.४ (प्रतिनिधी) ः- ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मौजे टाकळगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आली असून सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा माजी मंत्री शिवाजीराव पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्याहस्ते सत्कर करण्यात आला. यावेळी माजी सभापती अप्पासाहेब गव्हाणे, सरपंच महारुद्र कदम, उपसरपंच विलास गव्हाणे यांच्यासह सर्व सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील मौजे टाकळगाव ग्रामपंचायत बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने दणदणीत विजय मिळवत या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला. सरपंच म्हणून महारुद्र कदम हे विजयी झाले तर पॅनलचे पाच सदस्य बहुमताने विजयी झाले. उपसरपंच म्हणून विलास गव्हाणे यांची निवड करण्यात आली आहे. सरपंच व उपसरपंच आणि सर्व सदस्यांचा माजी  मंत्री शिवाजीराव पंडित, माजी आ.अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ग्रामस्थांच्यावतीने अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांचाही सत्कार करण्यात आला.
  यावेळी श्रीकृष्ण गव्हाणे विष्णू ढगे, भगवान गव्हाणे, हनुमान गव्हाणे, दिगांबर शेळके, श्रीराम धुताडमल, गौतम वडमारे, महादेव मानकर, श्रीराम गव्हाणे, सर्जेराव गव्हाणे, बप्पासाहेब पिंगळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!