ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

प्रा. किरण पाटलांच्या विजयावर आज शिक्कामोर्तब….! शिक्षक मतदार बांधवांनी प्रथम 1 पसंतीचे मतदान करावे – राजेंद्र मस्के

प्रा. किरण पाटलांच्या विजयावर आज शिक्कामोर्तब….!

शिक्षक मतदार बांधवांनी प्रथम 1 पसंतीचे मतदान करावे – राजेंद्र मस्के

बीड प्रतिनिधी ;-छत्रपती संभाजीनगर मराठवाडा शिक्षक मतदार शिक्षक मतदार संघातातील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा. पाटील किरण नारायणराव यांचा विजय निश्चित असून, सुजाण शिक्षक मतदार बांधव यांच्या विजयावर आज शिक्कामोर्तब करतील असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केला.

शिक्षक मतदार संघाची रणधुमाळी संपली असून, उद्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे.प्रा. किरण पाटील यांच्या विजयासाठी राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे, निवडणूक प्रभारी आ. जगजितसिंह राणा यांनी जिल्ह्यातील संस्थाचालक, प्राध्यापक, शिक्षक मतदारांशी थेट संवाद साधला. बीड जिल्ह्यासह आठही जिल्ह्यात उदंड प्रतीसाद मिळाला. प्रा. किरण पाटील यांच्या उमेदवारी पुढे विरोधातील एकही उमेदवार टिकू शकला नाही. विद्यमान शिक्षक आमदाराविषयी असलेला रोष शिक्षक मतदार आजच्या मतदानातून निश्चित पणे व्यक्त करणार आहेत. शिक्षक राष्ट्रीय आणि सामाजिक परिवर्तनात नेहमीच अग्रेसर असतात. राजकीय घडामोडींचा व्यापक विचार करून, दूरदृष्टीने मतदान करणारा घटक स्वताच्या हितासाठी चालू असलेल्या निवडणुकीत त्यांनी प्रा. किरण पाटील यांच्या विजयासाठी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेतला असल्याने विजय निश्चित आहे. लोकनेत्या पंकजाताई मुंडे, खा. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ. नमिताताई मुंदडा, माजी आमदार भीमराव धोंडे, आदिनाथराव नवले, आरटी देशमुख,केशव आंधळे, रमेशराव आडसकर,प्रा. चंद्रकांत मुळे,अशोक लोढा, अक्षय मुंदडा, आदित्य सारडा, सर्जेराव तांदळे, प्रा. देविदास नागरगोजे, सलीम जहागीर,नवनाथ शिराळे, विक्रांत हाजारी,डॉ. लक्ष्मण जाधव, अजय सवाई, बन्सी हावळे, किरण बांगर, शांतीनाथ डोरले, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मोर्चा आघाडी सह कार्यकर्ते  आणि पदाधिकारी गेली पंधरा दिवसापासून विजयासाठी अथक परिश्रम घेत आहेत.

बीड जिल्ह्यात 34 मतदान केंद्र असून, बीड तालुक्यात पिंपळनेर, मांजरसुंबा, व बीड शहरात मिलीया महाविद्यालय-2 , आणि चंपावती विद्यालय असे एकूण 5 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर भाजपा कार्यकर्त्यांची तगडी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतदार बांधवांनी प्रा. किरण पाटील यांनाच प्रथम 1 पसंतीचे मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन राजेंद्र मस्के यांनी केले आहेत.

error: Content is protected !!