ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

उत्तर महाराष्ट्रात भाजप मध्ये दोन गट का? नाशिक पदवीधर निवडणुकीत कार्यकर्ता मधे संभ्रम

नाशिक प्रतिनिधी –

नाशिक पदवीधर उमेदवारी वरून भाजपात मतभेद उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजप कडून कुठलाच उमेदवार उभा करण्यात आलेला नाही. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना भाजप कडून उमेदवारी ची अपेक्षा होती मात्र भाजप कडून त्यांना काञज चा घाट दाखवण्यात आला अशा परिस्थितीत त्यांनी भाजप कडून उमेदवारीची आशा सोडून महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाला, नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजप कडून संकट मोचक गिरीश महाजन यांना प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे व शुभांगी पाटील यांच्या निकटवर्तीय समजल्या जात होत्या. परंतु ऐनवेळेस त्यांनी गिरीश महाजन यांचा हात सोडून महाविकास आघाडी बरोबर जाणे पसंत केले.
उत्तर महाराष्ट्र राजकीय दृष्टिनी नेहमीच कमनशिबी ठरलेला आहे अनेक मातब्बर नेते असून सुद्धा मुख्यमंत्रीपदाला हुलकावणी उत्तर महाराष्ट्रातील नेत्याच्या वाट्याला आली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकी निमित्ताने पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र ढवळून निघाला परंतु चर्चा मात्र भाजप च्या भूमिके बद्दल यात मात्र तिळ मात्र शंका नाही.

error: Content is protected !!