ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा-प्रकुलगुरू प्रो.डाॅ. श्याम सिरसाट

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा-प्रकुलगुरू प्रो.डाॅ. श्याम सिरसाट
गढी:- जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर गढी येथे राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ” जागर लोकशाहीचा” एक दिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन प्रकुलगुरू प्रो.डाॅ.श्याम सिरसाठ त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सदाशिव सरकटे हे होते.
                उद्घाटनपर भाषणात बोलताना प्रो.डाॅ.श्याम सिरसाठ म्हणाले की, भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे.आपल्या देशाने लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे आपण स्वातंत्र्याचा पुर्णपणे उपभोग घेऊ शकतो.सर्व शासन व्यवस्थेत लोकशाही शासन व्यवस्था सर्वश्रेष्ठ आहे म्हणून आपण लोकशाहीची मूल्य जोपासली पाहिजेत.लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी आपण मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे.निवडणूक काळात जात, धर्म, पंथ यांना थारा न देता नि: पक्षपातीपणे ही प्रक्रिया राबवली गेली पाहिजे यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
          अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सदाशिव सरकटे म्हणाले की, महाविद्यालयीन युवकांनी मतदार नोंदणी करावी तसेच मतदानाचे कर्तव्य पार पाडावे.मतदानाविषयी समाजात जनजागृती करावी.हे करत असताना आपलाही उत्कर्ष साधावा असे आवाहन त्यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.धर्मराज कटके यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. डॉ.जयराम ढवळे यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्रा.रमेश रिंगणे यांनी करून दिला तर आभार प्रा. डॉ.शिवाजी काकडे यांनी मानले या प्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!