ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

आघाडीला ४० जागा मिळतील हा सर्व्हे सत्य परिस्थितीवर आधारित;

 

शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेला सात महिन्यांचा कालावधी झाला आहे. तरीदेखील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. फक्त १८ मंत्री सध्या सरकार चालवत आहेत. यावरूनच शिंदे-फडणवीस सरकारवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी टीका करत मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकण्याचे कारणच उघड केले.

एकनाथ खडसे म्हणाले, सध्या १८ मंत्र्यांच्या भरवशावर सरकारचा कारभार सुरू आहे. मात्र, खरे पाहता सत्ताधारी पक्षातील प्रत्येक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसला आहे. पण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की, आपोआप असंतोष उफाळून येईल. त्या असंतोषाला तोंड देणे सरकारला कठीण होईल.

त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही, असे खडसे म्हणाले. कल्याण येथील एका कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे हे उपस्थित होते. यावेळी शिंदे व फडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडत आहे, याविषयी खडसे यांना विचारणा केली असता त्यांनी हे उत्तर दिले. खडसे म्हणाले, १८ मंत्री राज्याचा कारभार चालवत असल्याने योग्य तो निर्णय होऊ शकत नाही.

तसेचजनसंपर्क कमी पडतोय. भाजपमधील अनेक आमदार व शिंदे गटातील आमदार मंत्रिमंडळात यायला इच्छुक आहेत. त्यामुळे कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचे हा पेच असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, असे ते म्हणाले. आंबेडकर आणि ठाकरे युतीविषयी खडसे म्हणाले, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती झाली.

 

error: Content is protected !!