ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

तालिबान्यांच्या निषेधार्थ पिंपरी येथील ‘एसएनबीपी’ विधी महाविद्यालयाचा पुढाकार

पिंपरी, दि. ११ फेब्रुवारी – अफगानिस्तान सरकारमध्ये असलेल्या तालिबान्यांनी तेथील महिलांना शिक्षणासह इतर प्रमुख प्रवाहापासून दूर ठेवण्याचे धोरण राबविले आहे. त्याच्या निषेधार्थ भारतीय युवा संयुक्त परिषदेने जागतिक पातळीवर ‘रेड कार्ड’ ही मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमध्ये आज (दि. ११) मोरवाडी, पिंपरी येथील एसएनबीपी विधी महाविद्यालयाच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत ‘रेड कार्ड’ दाखवून तालिबानी धोरणांचा निषेध नोंदविला. अफगानिस्तामध्ये तालिबान्यांचे शासन आल्यापासून तेथील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. शिक्षण, नौकरीसह इतर मुख्य प्रवाहांपासून महिलांना जाणिवपूर्वक दूर ठेवले जात आहे. महिलांना हिन दर्जाची वागणूक दिली जात आहे. त्या विरोधात भारतीय युवा संयुक्त परिषदेने ‘रेड कार्ड’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोहिम हाती घेतली आहे. संपूर्ण भारतातही ही मोहिम राबविली जात आहे. पुण्यामध्ये ही मोहिम यशस्वी व्हावी यासाठी एसएनबीपी विधी महाविद्यालयाने पुढाकार घेत आज ही मोहिम राबविली. सकाळी नऊ वाजता विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात सुमारे चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी रेड कार्ड दाखवून तालिबान्यांच्या धोरणाचा निषेध नोंदविला. यानंतर स्वाक्षरी मोहिम राबवून भारतीय युवा संयुक्त परिषदेच्या मोहिमेला पाठींबा दिला. तालिबान्यांच्या अन्यायाविरोधात भारतीय युवा संयुक्त परिषदेने सुरू केलेल्या रेड कार्ड मोहिमेला पाठींबा देत ही मोहिम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेणारे एसएनबीपी हे पुण्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. राज्य, देश तसेच जागतिक पातळीवरील चांगल्या उपक्रमांना एसएनबीपीचा नेहमीचा पाठींबा राहिला आहे. महिलांच्या हिताचे रक्षण व्हावे यासाठी एसएनबीपीने घेतलेल्या या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या मोहिमेसाठी महाविद्यालयाचे संस्थापक, अध्यक्ष डी. के. भोसले, संचालिका वृषाली भोसले, प्राचार्या डॉ. रोहिनी जगताप यांच्यासह कैलास पोळ, स्वप्नील जाधव, प्रिया तोतले, सोनाली देशमुख, पायल चौधरी ,राशिवदेकर मारुती, मोनिका सेहरावत, सुश्मिता कुमारी, ओंकार कोरवले, उज्वला भारती तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व कर्मचारी तर भारतीय युवा संयुक्त परिषदेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रशांत गुरव, शुभम काशिकर, अक्षय वायदंडे, विद्या अंबुरे उपस्थित होते.
बातम्या साठी संपर्क : ९६०४९५४७३७
संजय दाते पाटील

error: Content is protected !!