ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

अंगणवाडी शिक्षिकेस व्याजाच्या पैशाची परतफेड करुनही शिवीगाळ व मारहाण अवैध सावकारी कायदा नुसार गून्हा दाखल करण्याची मागणी करा

अंगणवाडी शिक्षिकेस व्याजाच्या पैशाची परतफेड करुनही शिवीगाळ व मारहाण

अवैध सावकारी कायदा नुसार गून्हा दाखल करण्याची मागणी करा

सामाजिक कार्यकर्त्या किस्कींदा पांचाळ यांच्या सहकार्याने 48 तासानंतर गुन्हा दाखल

बीड (प्रतिनिधी)- मौजे विडा ता.केज जि.बीड येथील एका अंगणवाडी शिक्षिकेस व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करुनही अर्चना दादाराव वाघमारे व सुमन भिमराव अहिरे या दोघींनी अंगणवाडी शाहेत जावून चापटाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडल्यानंतर  सदरील तक्रारदार महिलेने यांना बीड जिल्हा पोलीस अधिक्षक यांची भेट घेतल्यानंतर बीड पोलीस अधिक्षक यांनी पोलीस निरीक्षक केज यांनी संपर्क करुन तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश दिल्यानंतर सदरील उपरोक्त दोन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील आरोपींविरुद्ध अवैध सावकारी कायदा नुसार गून्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या किस्कींदा पांचाळ यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,  मौजे विडा ता. केज जि.बीड येथील सिमा बलभीम सुतार ही महिला अंगणवाडी शिक्षीका म्हणुन विडा येथे नोकरी करत आहे तिचे पती फॅब्रीकेशनचे मंजूरी काम करतात. सदरील महिलेच्या कुटुंबास उत्पन्नाचे जास्तीचे साधन नसल्यामुळे माझे उत्पन्नावर कुटुंबाचा खर्च भागत नाही तिने ऑगस्ट-2022 चे  महिन्यामध्ये मुलाच्या शिक्षणासाठी त्याच गावातील अर्चना दादाराव वाघमारे व सुमन अहिरे यांच्याकडे रक्कम रु.30,000/- रुपये मागितले त्यावेळी त्यांनी मला आम्ही तुला 30 हजार रुपये देतात परंतु तु आम्हांस 30 हजार रुपये परत देईपर्यंत पैशाला प्रति दिवस 3000/- रुपये या प्रमाणे व्याज द्यावे लागेल असे म्हणुन अट घातली. सदरील महिलेला पैशांची गरज असल्यामुळे तिने  अर्चना दादाराव वाघमारेच सुमन भिमराव अहिरे यांनी व्याजाची अट मान्य करुन त्यांचेकडुन रक्कम रु. 30 हजार रुपये व्याजाने घेतले आणि अर्चना दादाराव वाघमारे व सुमन भिमराव अहिरे यांचेकडून घेतलेली रक्कम रु. 30 हजार व त्यावरील व्याज असे एकुण रक्कम रु. 51,000/- रुपये रक्कम घेतल्यापासून 08 दिवसांचे आत परत दिले आहेत. सदर रक्कम व्याजासह परत देवुनही तक्रारदार महिलेस अर्चना दादाराव वाघमारे व सुमन भिमराव अहिरे या दोघी तुझ्याकडे खुप व्याज झाले आहे, तु आणखीन दोन लाख रुपये दे किंवा तुझ्या नावावरील घर मला तु लिहून दे असे म्हणुन पैशासाठी सतत तगादा लावत असत, पैशाच्या मागणीसाठी सदर दोघी तक्रारदाराच्या घरी, अंगणवाडी शाळेमध्ये तसेच रस्त्याने जात येत असतांना व माझे दारा समोर माझेकडे येवुन तक्रारदारास सतत शिवीगाळ करुन  पैशाच्या मागणीसाठी तक्रारदाराच्या मुलास आणि पतीसही सतत शिवीगाळ करुन धमक्या देत आहेत. उपरोक्त दोघी या तक्रारदार घरी असतांना सदर दोघी मिळुन घरी आल्या व तक्रारदार महिलेस  पैशाच्या मागणीसाठी शिवीगाळ करुन घरातुन ओढुन हाणमार केली. त्यामुळे तक्रारदार ही भितीने गावातुन निघुन बाहेर गेलेली आहे. वास्तविक तक्रारदाराकडे सदर दोघींचे काहीही देणे राहिलेले नाही, असे असतांना सदर दोघी तक्रारदार हीस म्हणाल्या की, जर पैसे दिले नाहीत तर आम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींवर अ‍ॅट्रॉसिटीचा व इतर गुन्हे दाखल करु अशा धमक्या देत आहेत. तसेच  आमचे कोणीही काहीही बिघडवु शकत नाही व आमचेविरुध्द पोलिस देखील तक्रार घेत नाहीत, त्यामुळे तुला काय करायचे ते कर अशी धमकी देत आहे. म्हणुन तक्रारदार हिने दिनांक 01-03-2023 रोजी पोलिस निरीक्षक, केज यांची भेट घेवून येथे तक्रारी अर्ज देण्यासाठी गेले असता पोलिसांनी अर्चना दादाराव वाघमारे यांना अर्जदाराची तक्रार न घेता बोलावुन घेतले व तुमची तक्रार न घेता मी प्रकरण आपसात बसुन मिटवतो असे तक्रारदारास सांगितले. दुसर्‍या दिवशी सकाळी अंगणवाडी शाळेमध्ये गेल्यानंतर तक्रारदारास भेटायला अर्चना दादाराव वाघमारे व तिची आई नामे सुमन भिमराव अहिरे या गेल्या व म्हणाल्या की, “ तु केज ला जावुन माझ्या विरोधात तक्रार देण्यास का गेली होतीस, तुझी तक्रार कोणीही घेणार नाही” म्हणून तक्रारदाराला शाळेतच चापटाने लाथाबुक्यांनी व तोंडावर चापटा मारला व तक्रारदाराचे केस ओढुन तक्रारदारास खाली पाडून मारहाण केली व आमच्या दोघीं विरुध्द तक्रार केलीस तर तुला बघुन घेईल अशी धमकी दिली. त्यामुळे तक्रारदार सीमा बलभीम सुतार हिने भयभीत होवून बीड जिल्हा पोलीस अधिक्षक यांची भेट घेतली त्यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी केज पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क करुन तात्काळ तक्रार  नोंदविण्याचे आदेश केले त्यानंतर रितसर तक्रार नोदंवून उपरोक्त अर्चना दादाराव वाघमारे व सुमन भिमराव अहिरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. तक्रारदार महिला सीमा बलभीम सुतार हिस सामाजिक कार्यकर्त्या किस्कींदा पांचाळ यांनी मदत केली. सदरील आरोपींविरुद्ध अवैध सावकारी कायदा नुसार गून्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या किस्कींदा पांचाळ यांनी केली आहे.सदरील तक्रारदार व तिच्या कुटूंबियास जिवाला धोका असून त्यांना संरक्षण द्या अशी मागणी लवकरच जिल्हा पोलीस अधिक्षक यांची भेट घेवून करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या किस्कींदा पांचाळ यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!