ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

ज्येष्ठ पत्रकार वि.वि.करमरकर यांचे निधन ; माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून शोक वक्त* *वि.वि.करमरकर यांच्या निधनाने क्रीडा पत्रकारितेचा नायक हरपला – छगन भुजबळ

 

नाशिक,दि.६ मार्च :- ज्येष्ठ पत्रकार क्रीडा पानाचे जनक अशी ओळख असलेले वि.वि.करमरकर यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रीडा पत्रकारितेत अतुलीनीय योगदान देणारा नायक हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.

छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, मुळचे नाशिकचे असलेले वि.वि.करमरकर यांनी नाशिकमध्ये आपले उच्चशिक्षण पूर्ण करत नाशिक शहरातून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. त्यांनी मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू केली. देशी, विदेशी खेळांना मानाचे पान त्यांनी दिल. त्यामुळे क्रीडा पानाचे जनक अशी ओळख त्यांना मिळाली. सामाजवादी विचारांच्या जडणघडणीत तयार झालेल्या करमरकर यांनी आपल्या उभ्या आयुष्यात सतत पारदर्शक कारभाराचा अट्टहास धरला. क्रिकेटसोबत खोखो, कबड्डी, कुस्ती या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय करण्यात त्या त्या संस्थांसह करमरकर यांच्या मार्गदर्शक लेखणीचा खूप मोठा वाटा आहे. करमरकर यांच्या लेखणीला धार होती. खेळ आणि खेळाडूंच्या पलीकडची बातमी वाचकांसमोर ठेवताना त्यांनी एक मोठा कॅनव्हास उभा केला. त्यांच्या लेखणी मुळे खेळांचा प्रचार प्रसार होत राहिला.

त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रातील संवेदनशील लेखक, समीक्षक काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी व माझे कुटुंबीय करमरकर कुटुंबियांच्या दुखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

error: Content is protected !!