ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

पंगत वाढली, ताटात मिष्टांनांची मेजवानी; हनुमान जयंतीनिमित्त वानरसेनेचा अनोखा पाहुणचार

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

पंगत वाढली, ताटात मिष्टांनांची मेजवानी; हनुमान जयंतीनिमित्त वानरसेनेचा अनोखा पाहुणचार

अकोला (प्रतिनिधी):- काल संपूर्ण देशभरात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राज्यातही ठिकठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

राज्यातही ठिकठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील कोथळी खुर्द गावातही काल उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात आली.

काल (गुरुवारी) हनुमान जयंतीनिमित्त एक अनोखी पंगत पार पडली.

पण ही पंगत कोणत्याही गावकऱ्यांची नव्हती, ही पंगत होती माकडांची.

गावातील मुंगसाजी महाराज संस्थानच्या वतीनं माकडांना मिष्टान्नाची पंगत देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, माकडांनीही अगदी शिस्तीत हा पंगतीचा आस्वाद घेत मिष्टान्नांवर ताव मारलाय.

या अनोख्या पंगतीचे फोटो सध्या व्हायरल होताहेत. रामदास महाराजांनी माकडांना ही पंगत दिलीये.

error: Content is protected !!