ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून किल्ले रायगडावर अभिवादन

 

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समितीद्वारे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले तसेच महाराजांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून, मानवंदना दिली. रायगड पोलिसांतर्फे शिवरायांना यावेळी मानवंदना देण्यात आली.

तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती दिवशी असते. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे किल्ले रायगडावर शिवाजी महाराजांच्या 343 व्या पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमानिमित्त यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, “शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी आपले कर्तृत्व दाखविले म्हणूनच आज आपण हिंदू म्हणून अभिमानाने जगू शकतो. अन्यथा सर्वांची सुन्नत झाली असती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाला 343 वर्षे होऊनही त्यांची किर्ती कमी झालेली नाही आणि पुढील हजारो वर्षे त्यांची किर्ती वाढतच राहणार आहे!”

मंत्री लोढा पुढे म्हणाले की, “येत्या 2 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ज्या रथयात्रा निघणार आहेत, त्या रथयात्रांना राज्याचा पर्यटन विभाग गावोगावी सहकार्य करेल!”

यावेळी पहाटे श्री जगदीश्वर पूजा, हनुमान जयंती निमित्त पूजा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाची पूजा करण्यात आली. त्याचप्रमाणे विविध पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात आले. तसेच किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावात उभारण्यात येत असलेल्या हिरकणी स्मारकाचे भूमिपूजन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी किल्ले रायगडावर आमदार भरतशेठ गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील, मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे, कार्यवाह सुधीर थोरात, इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर आणि हजारोंच्या संख्येने शिवभक्त आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!