ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

डॉ. सुजीत उत्तम हजारे यांचा सिरसमार्ग ग्रामस्थांकडून नागरी सत्कार

डॉ. सुजीत उत्तम हजारे यांचा सिरसमार्ग ग्रामस्थांकडून नागरी सत्कार
— ग्रामपंचायत कार्यालय, समर्थ विद्यालय, समाजबांधवाकडून गौरव
गेवराई, दि.२४ ;- एमबीबीएस परिक्षेत उतुंग यश मिळवुन, सिरसमार्ग गावचे नाव रोशन केल्याबद्दल, सिरसमार्ग येथील भूमीपूत्र तथा दैनिक लोकाशाचे निवासी संपादक उत्तम हजारे यांचे चिरंजीव डॉ. सुजीत हजारे यांचा सिरसमार्ग ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला . विविध पक्ष संघटना व मित्र परिवाराच्या वतीने डॉ. सुजीत हजारे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
   सिरसमार्ग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व समाजबांधवाच्या वतीने डॉ. सुजीत हजारे यांचा पूज्य भन्ते धम्मशील यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी शेकडो समाजबांधव, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. मादळमोही येथील जिल्हा परिषदेचे माजी सभापती पंढरीनाथ लगड, कोळगावचे पत्रकार बाळासाहेब घाडगे यांनी डॉ. सुजीत यांचा सत्कार केला. सिरसमार्ग येथील सिंदफणा पतसंस्थेत अध्यक्ष दिनेश गुळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सुजीत यांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला, यावेळी बँकेतील कर्मचारी उपस्थित होते. सिरसमार्ग येथील समर्थ विद्यालयाच्या वतीने डॉ. सुजीत हजारे यांचा भव्य सत्कार करण्यात आला, यावेळी संस्थेचे सचिव सुभाषराव पवळ, भारत मगर सर, बेद्रे सर, काशीद सर, जमदाडे सर, शिंदे सर, टाकसाळ सर, शरद मगर सर, आहेर सर, करांडे सर, पवळ सर, कात्रजकर सर, केंद्रे मॅडम आदींची उपस्थिती होती. ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. सुजीत हजारे यांच्या सत्काराचे आयोजन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी ह. भ. प. धुराजी महाराज कोळेकर, माजी सभापती पांडुरंगराव कोळेकर, सरपंच सुरेश मार्कड, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कुडके, माजी सरपंच सोमेश्वर गंचाडे, राहूल हजारे, संतोष परदेशी, दिमाखवाडीचे सरपंच दिलीप पवार, डॉ. गवळी, नागेश रडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोडके यांनी केले. व्यापारी बांधवाच्या वतीने मधुकर पवळ यांनी डॉ. सुजीत हजारे यांचा सत्कार केला.
चौकट
नोटांचा हार घालून सत्कार
सिरसमार्ग गावात ठिकठिकाणी विविध संस्था व मित्र परिवाराच्या वतीने डॉ. सुजीत हजारे यांचा सत्कार करण्यात आला. बीड येथील सरस्वती विद्यालयाचे संस्थापक तथा संस्थाचालक महामंडळाचे जिल्हा सरचिटणीस उत्तमराव पवार, काँग्रेस अनु.जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पवार व पवार परिवाराच्या वतीने नोटांचा हार घालुन, डॉ. सुजीत उत्तम हजारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
error: Content is protected !!