ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

वादळाने घराच्या टॉवरची भिंत कोसळली; मोठी जिवीतहानी टळली

महेन्द्र भगत अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी;

दिनांक २० एप्रिल रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान अंजनगाव सुर्जी तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे तालुक्यातील चौसाळा येथील एका घराच्या टॉवरची भिंत कोसळली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्याने थैमान घातले असून तालुक्यात पिकासह झाडांची पडझड तसेच मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले.  ग्राम चौसाळा येथील रवींद्र महादेवराव ढोके यांच्या घराच्या टावरची भींत वादळी वाऱ्याने कोसळली असून, ही भिंत 15 फूट रुंद 8 फूट उंच होती वादळी वाऱ्याने गावात अनेक घराची पडझड झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून मालमत्तेचा बरेचसे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच चौसाळा येथील तलाठी व कोतवाल यांनी रविंद्र ढोके यांच्या पडलेल्या घराच्या भिंतीचा पंचनामा केला.

error: Content is protected !!