ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

तीन राज्यांत गारपीट .याशिवाय केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाची शक्यता

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

तीन राज्यांत गारपीट .याशिवाय केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाची शक्यता

मोचा चक्रीवादळामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या हवामानातही बदल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसंच मच्छीमारांनी पुढील चार दिवस समुद्रापासून दूर राहा असाही सावधानतेचा इशारा दिला आहे. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांत गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

हवामान विभागाचे महासंचलाकल मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 मे पर्यंत खाडीच्या दक्षिण-पूर्व दिशेला कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची आणि चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ मंगळवार किंवा बुधवारी उत्तरेच्या दिशेने मध्य बंगालच्या खाडीकडे जाईल.

मच्छिमारांना इशारा देण्यात आला असून रविवारी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जे लोक बंगालच्या खाडीत दक्षिण-पूर्व दिशेला आहेत त्यांनी 7 मे च्या आधी आणि मध्य खाडीत असलेल्यांनी 9 मे आधी सुरक्षित ठिकाणी परतण्याचा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही मुख्य सचिवांना चक्रीवादळाची सतत माहिती घेण्यास आणि बारकाईने देखरेख करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व विभागांसोबत समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय संबंधित विभागांनी अलर्ट राहावं असंही सांगितलं आहे.

मोचा चक्रीवादळामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या हवामानातही बदल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसंच मच्छीमारांनी पुढील चार दिवस समुद्रापासून दूर राहा असाही सावधानतेचा इशारा दिला आहे. पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांत गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय केरळ, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!