ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

रेल्वे रुळावरुन एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने मोठी दुर्घटना

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

रेल्वे रुळावरुन एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने मोठी दुर्घटना

कोलकाता(प्रतिनिधी):- पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे आज सायंकाळी ५ वाजता रेल्वे रुळावरुन एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. गुवाहाटीहून जाणाऱ्या बिकानेर एक्स्प्रेसचे उत्तर बंगालमधील कूचबिहार आणि जलपाईगुडी दरम्यान डोमोहनीजवळ मायागोरी येथे ४-५ डबे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण १२ डब्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातातील मृतांची नेमकी संख्या आद्याप अद्याप समजू शकलेली नाही. पण अपघाताची तीव्रता पाहता अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. उलटलेल्या डब्यांमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी अडकले असून अनेक जखमी झाले आहेत.

ट्रेन क्रमांक १५६३३ बिकानेर एक्सप्रेस मंगळवारी रात्री राजस्थानमधील बिकानेर येथून निघाली होती. गुरुवारी सकाळी ५.४४ वाजता ही ट्रेन पाटणा रेल्वे स्थानकातून निघून दुपारी २ वाजता किशनगंजला पोहोचली आणि तेथून गुवाहाटीकडे रवाना झाली. भारतीय रेल्वेने ८१३४०५४९९९ हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. अजूनही अनेक लोक ट्रेनमध्ये अडकले असून, त्यांचे बचावकार्य सुरू आहे.

दरम्यान, या भीषण रेल्वे अपघाताची रेल्वे मंत्रालयाने दखल घेतली आहे. तसंच या प्रकरणी रेल्वेने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली आहे. रेल्वे हेल्पलाइन नंबरही जारी केले आहेत. Railway Helpline numbers – 03612731622, 03612731623

पाटणा रेल्वे स्थानकावरून या एक्स्प्रेसमध्ये ९८ प्रवासी चढले होते. तर ३ प्रवासी मोकामा आणि २ बख्तीयारपूर येथून चढले होते, अशी माहिती पाटण्यातील आरक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याने दिली.

मदत आणि बचावकार्यासाठी NDRF च्या दोन टीम रवाना करण्यात आल्या आहेत. या टीम लवकरच घटनास्थळी दाखल होतील, अशी माहिती एनडीआरएफचे महासंचालक अतुल करवाल यांनी दिली.

error: Content is protected !!