ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

स्नेहभोजनाचं ‘टायमिंग’, राऊतांवरील कारवाई, सर्वपक्षीय आमदार पवारांच्या घरी

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

स्नेहभोजनाचं ‘टायमिंग’, राऊतांवरील कारवाई, सर्वपक्षीय आमदार पवारांच्या घरी

नवी दिल्ली :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महाराष्ट्रातील आमदारांसाठी आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे तसंच भाजपचे अनेक आमदार उपस्थित आहेत. विशेष म्हणजे आज ईडीची कारवाई झालेले संजय राऊत पवारांच्या एका बाजूला बसलेले आहेत, तर देशाचे पॉवरफुल राजकारणी आणि लोकप्रिय मंत्री नितीन गडकरी पवारांच्या दुसऱ्या बाजूला बसलेले आहेत. राज्यातील सत्ताधारी विरोधक यानिमित्ताने एकत्र आलेले पाहायला मिळाले. यानिमित्ताने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ असल्याचं पुन्हा दिसून आलं.

महाराष्ट्रातले सगळे आमदार प्रशिक्षणासाठी सध्या राजधानी नवी दिल्लीमध्ये आहेत. याचनिमित्ताने शरद पवार यांनी आमदारांसाठी आज रात्री स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. या स्नेहभोजनाला राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस तसंच भाजपच्याही आमदारांना निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानुसार चारही पक्षांचे आमदार आणि काही निवडक खासदारांनी स्नेहभोजनाला उपस्थिती लावली आहे.

स्नेहभोजनास कोण कोण उपस्थित?

पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, डॉ. फौजिया खान, विनायक राऊत, श्रीनिवास पाटील, डॉ. अमोल कोल्हे, श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर इ. खासदारांनी उपस्थिती लावली आहे. तर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कृषीमंत्री दादाजी भुसे, रोहित पवार, आदिती तटकरे, सुनील शेळके, झिशान सिद्धीकी, अनिकेत तटकरे, डॉ. प्रज्ञा सातव तसंच भाजपचे देखील आमदार उपस्थित आहेत.

स्नेहभोजनाचं ‘टायमिंग’, राऊतांवरील कारवाई, सर्वपक्षीय आमदार पवारांच्या घरी

शरद पवार यांच्या निवासस्थानी आज नियोजित स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. पण तत्पूर्वी आज दुपारी ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली. आलिबागमधील ८ भूखंड आणि दादरमधील राहता फ्लॅट ईडीने सील केला. ईडीच्या कारवाईनंतर कुणाच्या बापाला घाबरणार नाही. कितीही कारवाया करा, गुडघे टेकणार नाही. भाजपला पुरुन उरेन, अशी आक्रमक प्रतिक्रिया राऊतांनी प्रसारमाध्यमांना दिली. ईडीची कारवाई होऊन काही तासांचा अवधी लोटलाय, ज्यानंतर राऊतांनी पवारांच्या घरी स्नेहभोजनास हजेरी लावली आहे.

 

error: Content is protected !!