ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

यंदाची आषाढी एकादशी वेगळी ठरणार: आषाढी एकादशी आणि बकरी ईद दोन्ही सण एकाच दिवशी होणार साजरी

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.उपसंपादक.दै.महाराष्ट्र सूर्योदय

यंदाची आषाढी एकादशी वेगळी ठरणार: आषाढी एकादशी आणि बकरी ईद दोन्ही सण एकाच दिवशी होणार साजरी

 

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी) :- आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यामुळे प्रत्येकाला विठ्ठलाची आणि आषाढीची आतुरता लागून आहे. मात्र यंदाची आषाढी एकादशी वेगळी ठरणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद आल्याने हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरी होणार आहेत. मात्र, या सणाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन बघायला मिळत आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या वतीने कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून कौतुक होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये किरकोळ कारणावरून दंगली घडत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी एकतेचा संदेश देणारा निर्णय घेतला आहे.

शहरातील खानावळींच्या दरांना वाढीचा ‘तडका’,मासिक दरांमध्ये काही प्रमाणात वाढ

आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्यामुळे त्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय पंढरपूरसह जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. यामुळे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुन्हा हिंदू मुस्लिम एकता बघायला मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी कुठल्याही छोट्या-मोठ्या घटनांचे रूपांतर मोठ्या घटनांमध्ये होत असते. यामुळे पोलिसांच्या वतीने खबरदारी बाळगण्यात आली आहे.

error: Content is protected !!