ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

मुंबईसह राज्यात परतीचा पाऊस घालणार धुमाकूळ; आज ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा

 

देशभरासह अनेक राज्यांमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. तर राज्यात पुणे, मुंबईसह अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाचा जोर दिसून येत आहे. राज्यात पुढील ४८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आजही पुणे मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईसह पुण्यामध्ये वातावरण ढगाळ राहील. मुंबईच्या काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्याच्या अनेक भागात काल (रविवारी) मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुण्यासह आसपासच्या भागांमध्ये पावसाचा जोर दिसून आला. यावेळी देशात सरासरीच्या 94 % पाऊस झाला आहे. तर राज्यात सरासरीच्या 97 टक्के पाऊस झाला.

error: Content is protected !!