ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

नाशकात लेझर लाईटमुळे गणपती विसर्जन मिरवणुकीतील 6 जणांची नजर कमकुवत! डोळे जाण्याची भीती

 

गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजेबरोबर वापर्यंत आलेल्या लेझर लाईटमुळे सहा रुग्णांच्या दृष्टीवर भयानक परिणाम झाल्याचं समोर आल आहे. तब्बल आठ वर्षानंतर नाशिक शहरांमध्ये डीजेला विसर्जन मिरवणुकीमध्ये परवानगी देण्यात आली होती. डीजेच्या तालावर नाचताना बेभान होणाऱ्या तरुणांवर डिजेवर लावलेल्या लेझर लाईटची प्रखर प्रकाश झोत पडल्याने काहींच्या डोळ्यांमध्ये इजा तर काहींच्या डोळ्यांमध्ये काळे डाग निर्माण झाले आहेत. तरुणांच्या डोळ्यावर भाजल्यासारख्या जखमा नेत्ररोग तज्ञांना आढळून आल्या आहेत.

या रुग्णांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. अशा प्रकारचा त्रास होत असलेल्या पीडितांनी तातडीने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावं असा आवाहन करण्यात आले आहे. नेत्ररोग तज्ञ संघटनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत जनजागृती देखिल सुरू केली असून सरकारने या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंतीही केली आहे. मनसे राज ठाकरेंच्या ट्विटनंतर हा विषय चर्चेत आला असतानाच नाशिकमध्ये असे प्रकरणेच समोर येऊ लागली आहेत.

“रुग्णांनी सांगितले की गणपती मिरवणुकीमध्ये लेझर लाईटसच्या संपर्कात ते आले होते. सर्व रुग्णांनी हेच सांगितले. सर्व रुग्ण हे नाशिक शहरातील होते. याबद्दल आमच्या ग्रुपवर चर्चा झाल्यानंतर नंदुरबार, धुळे आणि मुंबई इथल्या मित्रांनीही याबाबत सांगितले. आम्ही सगळेच जण या रुग्णांची दृष्टी जितकी बचावता येईल यासाठी प्रयत्न करत आहोत. पण ते पूर्णपणे व्यवस्थित होऊ शकणार नाही,” असे नेत्ररोग तज्ज्ञांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!