ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण – सुधीर मुनगंटीवार

 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यावर चाल करणाऱ्या अफजलखानाचा कोथळा वाघनखांनी बाहेर काढला हे आपण लहानपणापासून शिकलो आहोत; ऐकत आलो आहोत. ती वाघनखे ३५० व्या राज्याभिषेक वर्षात शिवप्रेमींच्या दर्शनाला भारतात आणण्याच्या दृष्टीने करार करण्यास लंडन येथे जाताना खूप अभिमान वाटतो आहे, असे भावोद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

लंडन येथे रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळ मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मुनगंटीवार कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. मुनगंटीवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पोहोचताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या, ढोल ताशांचा गजर आणि लेझिम पथकाने परिसर दणाणून सोडला.

यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहीती देत हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित रयतेचे राज्य महाराष्ट्राला देण्याचा संकल्प करुन काम करीत असल्याचे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, आमची प्रेरणा आहे त्यांच्या विचारसरणीला धरून केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार काम करीत आहे हे स्पष्ट केले.

error: Content is protected !!