ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

मोठी बातमी : मनसे लोकसभा निवडणूक लढणार

राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप, शिवसेना(शिंदे, ठाकरे गट), राष्ट्रवादी(दोन्ही गट) यांच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसेने) लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून विरोधकांच्या चिंतेत मनसे भर घालणार आहे.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे. लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे. मनसे यंदाची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवेल असे म्हटले जात आहे.

मात्र मनसेवर नेहमीच आपल्या भूमिका बदलण्याचा आरोप होतो. टोलचा विषय असू दे, की नरेंद्र मोदी यांना आधी पाठिंबा मग विरोध असू दे, की मराठी माणसावरून थेट हिंदुत्वाचा विषय असू दे. राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनसे वेळोवेळी आपल्या भूमिका बदलतात असे म्हटले जाते. यात अजून एका भूमिकेची भर पडली असल्याचे समोर येत आहे.

 

error: Content is protected !!