ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

काेराेना काळानंतर आशा सेविकांकडे सरकारचे दुर्लक्ष ;ऑनलाईन कामाच्या दबावामुळे राज्यभर तील २ आशा चा मृत्यू . तर ७२ प्रकारची काम आशा कडे

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

काेराेना  काळानंतर आशा सेविकांकडे सरकारचे दुर्लक्ष ;ऑनलाईन कामाच्या दबावामुळे राज्यभर तील २ आशा चा मृत्यू . तर ७२ प्रकारची काम आशा कडे

नाशिक(प्रतिनिधी):- जिल्हा परिषदेवर आशा वर्करच्या विविध मागण्यांसाठी आयटकच्या वतीने आज (साेमवार)रोजी मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदाेलकांनी जिल्हा परिषदेच्या गेटवर ठिय्या आंदोलन देखील केले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची नेमणूक झाल्यापासून दिवसेंदिवस कामाचा दबाब वाढवण्यात येत आहे. अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका स्वतः विधवा, घटस्फोटीत किंवा ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे अशा असून वाढत्या महागाईच्या काळात प्रपंच चालवणे कठीण होत आहे.

ऑनलाईन कामाच्या दबावामुळे राज्यभर तील २ आशा चा मृत्यू झाला आहे. ७२ प्रकारची काम आशा करतात. त्या कामावर आँनलाईन कामामुळे परिणाम होत आहे. ते काम कॉम्प्युटर ऑपरेटर नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या.

गट प्रवर्तक कर्मचा-यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी व भत्ते लागू करावेत. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचा-यांना लागू असलेली वेतनश्रेणी देण्यात यावी.

कंत्राटी कर्मचा-यांना लागू असलेली वार्षिक वेतन वाढ 5 टक्के व अनुभव बोनस 15 टक्के देण्यात यावा या खेरीज गट प्रवर्तक यांना प्रवास भत्ता देण्यात यावा. आशा वर्करला किमान वेतन, दिवाळी भाऊबीज दहा हजार रुपये लागू करण्यात यावी.

आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना ऑनलाईन कामे करण्याची शक्ती करू नये,विना मोबदला कामे सांगू नये.आरोग्य खात्यातील 50 टक्के रिक्त जागा पात्रतेनुसार आशा व गट प्रवर्तक मधून भरा. आभा कार्ड,गोल्डन ई कार्ड काढण्याची सक्ती करण्यात येऊ नये.गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करण्यात यावा या प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या.

error: Content is protected !!