ब्रेकिंग न्युज
काँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोलसुशी येथे आज महंत शिवाजी महाराजांचे काल्याचे किर्तन

बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड मजूर म्हणून आहे ,ही ओळख मोडल्याशिवाय शिवाय स्वस्त बसणार नाही.- पालकमंत्री धनंजय मुंडे

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड मजूर म्हणून आहे ,ही ओळख मोडल्याशिवाय शिवाय स्वस्त बसणार नाही.- पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड (प्रतिनिधी):-येणाऱ्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा अग्रीम जमा करण्यात येणार आहे . जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा अग्रीम जमा नाही झालं तर, मी देखील माझ्या घरात दिवाळी साजरी करणार नाही. असा शब्द आणि विश्वास राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. ते बीडमध्ये कृषी विभागाच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, बीड जिल्ह्याची ओळख ही वारंवार मागासलेला जिल्हा, ऊसतोड मजुराचा जिल्हा म्हणून केली जात आहे. मात्र ही ओळख कुठेतरी आपल्याला मोडायची आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मागासलेपणाची आणि ऊसतोड मजूर म्हणून असणारी जिल्ह्याची ही ओळख मोडल्याशिवाय शिवाय स्वस्त बसणार नाही. असा प्रण धनंजय मुंडे यांनी केलाय.

पुढे बोलतांना मुंडे म्हणाले की, आज जर शेतकरी संकटात असेल तर कृषीमंत्री म्हणून मी दिवाळी कशी साजरी करणार? मी देखील शेतकऱ्याचं पोरगा आहे. शेतकऱ्यांची काय अडचण आहे, हे मला चांगलं माहित आहे, जाणीव आहे. त्यामुळे कोणी वेगवेगळे प्रचार करतील, मोठमोठ्या सभेतून आरोप करतील, काय झालं पिक विम्याचे ? असं म्हणतील मात्र तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. असंही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

1998 ला जर कोणी पिक विमा बाबत सांगितले असेल तर अटलजींच्या समोर माझे वडील स्वर्गीय पंडित आण्णा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समोर पिक विमा बाबत सांगितलं होतं. आणि त्यानंतर पिक विमा लागू झाला. एवढंच नाही तर मोझ्याक बाबतीत पंचनामे झालेत. त्यामुळे यावर देखील अंतिम निर्णय येणाऱ्या कॅबिनेटमध्ये होणार आहे, असं धनंजय मुंडे म्हणालेत.

error: Content is protected !!