ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कामगारांना कामावर न जाण्याचे केलेआवाहन

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कामगारांना कामावर न जाण्याचे केलेआवाहन

पुणे (प्रतिनिधी):-मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी सरकारला दिलेली २४ ऑक्टोबरची डेडलाईन हुकली आहे. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारला पेलवणार नाही, असं आंदोलन करु असा इशारा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. त्याचे पडसाद आज सकाळी पुण्यात पाहायला मिळाले.

चाकण औद्योगिक क्षेत्रात कामावर निघालेल्या कामगारांच्या बस मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवल्या आहेत. कामगारांना कामावर न जाण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केले. कामगारांच्या बस पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाक्यावर रोखल्या आहेत.
मराठा क्रांती मोर्चाकडून आज चाकण औद्योगिक क्षेत्र एक दिवस बंदची हाक देण्यात आली होती. तरीही कंपन्या बंद न ठेवता कामगार कंपनीकडे जात असताना मराठा बांधवांनी पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाक्यावर कामगारांची वाहतूक करणाऱ्या बस रोखून धरल्या.

यावेळी कामगारांना मराठा आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान चांडोली येथे बस रोखल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होण्याच्या तयारीत असून केंद्र आणि राज्य सरकारने सकारात्मक विचार करावा असे आवाहन देखील करण्यात आले.

error: Content is protected !!