ब्रेकिंग न्युज
जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

बीड जिल्ह्यात एसटी बस सेवा ठप्प; बस जाळल्याने सकाळपासून एकही फेरी नाही

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

बीड जिल्ह्यात एसटी बस सेवा ठप्प; बस जाळल्याने सकाळपासून एकही फेरी नाही

बीड(प्रतिनिधी) :- शनिवारी दि (२८) रात्री धुळे- सोलापूर महामार्गावर बीडच्या महालक्ष्मी चौकामध्ये टायर जाळून महामार्ग अडवण्यात आला होता. तर त्यानंतर अज्ञात व्यक्तींकडून आहेर वडगाव फाट्यावर बीड- कोल्हापूर ही स्लीपर एसटी बस जाळण्यात आली होती. त्याचबरोबर एका बसवर दगडफेक करत जाळण्याचा प्रयत्न देखील केला होता. यानंतर आता बीडमध्ये एसटी बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झाले आहे.

रात्री बस पेटवून दिल्याने बीड बसस्थानकातून एकही बस बाहेर सोडली जात नाही. त्यामुळे अद्याप एकही बस फेरी झाली नाही. त्याचबरोबर जिल्ह्यातील आठही आगारातील बसफेऱ्या रद्द केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. मात्र याविषयी एसटी महामंडळाचे विभागीय अधिकारी अजय मोरे यांच्याशी माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र सध्यातरी बस फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे मात्र हाल सुरू झाले आहेत.

error: Content is protected !!