ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

बीडहून अहमदनगरकडे जाणाऱ्या अॅम्बुलन्सला भीषण अपघात

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

बीडहून अहमदनगरकडे जाणाऱ्या  अॅम्बुलन्सला भीषण अपघात

बीड (प्रतिनिधी):-बीडमध्ये महामार्गावर झालेल्या दोन अपघातांत १० जणांचा मृ्त्यू झाला आहे. बीडहून अहमदनगरकडे जाणाऱ्या एका अॅम्बुलन्सला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डॉक्टरसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
तर दुसरा अपघात मुंबईहून बीडकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सला झाला आहे. ट्रव्हल्स उलटून झालेल्या या अपघतात एकूण ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीत दोलावडगाव येथे एका भरधाव अॅम्बुलन्सने ट्रकला मागच्या बाजून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघातात अॅम्बुलन्स चालक भरत सिताराम लोखंडे (35 वर्ष), मनोज पांगु तिरपुडे, पप्पु पांगु तिरखुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के (वय 35 वर्ष) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दुसरीकडे मुंबईहून बीडकडे जाणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सच्या बसला अपघाता झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटून हा अपघात झाला आहे. आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील आष्टा फाटाजवळ हा अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

error: Content is protected !!