पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधि;
अंजनगाव सुर्जी येथे भारतीय जनता पक्षाची नुकतीच तालुकास्तरीय जंबो कार्यकारणी घोषित करण्यात आली असुन, याप्रसंगी भाजपा अमरावती जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या हस्ते तसेच अकोट विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे, दर्यापुर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रमेश बुंदीले व अंजनगाव सुर्जी शहराचे माजी नगराध्यक्ष ॲड.कमलकांत लाडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते श्री.निलेश महादेवराव पाटील यांची अंजनगाव सुर्जी शहर सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्तीची घोषणा करण्यात आली असुन, त्यांना मान्यवरांच्या वतीने पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्याबद्दल निलेश पाटील यांनी खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार प्रकाश पाटील भारसाकळे,माजी आमदार रमेश बुंदिले व माजी नगराध्यक्ष ॲड.कमलकांत लाडोळे, सरचिटणीस डॉ.विलासराव कविटकर, दर्यापूर विधानसभा प्रमुख गोपाल चंदन, ॲड.पद्माकर सांगोळे, भाजपा शहराध्यक्ष उमेश भोंडे, तालुकाध्यक्ष रविकुमार गोळे यांचे शतश: आभार मानले. तसेच अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी आपण सदैव तत्पर राहणार असल्याचे निलेश पाटील या़ंनी याप्रसंगी बोलतांना प्रतिपादन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातील समस्त आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. निलेश पाटिल यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरुन अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.