ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

भाजपा शहर सचिव पदी सुनिल माकोडे यांची नियुक्ती

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधि;

अंजनगाव सुर्जी येथे भारतीय जनता पक्षाची नुकतीच तालुकास्तरीय जंबो कार्यकारणी घोषित करण्यात आली असुन,याप्रसंगी भाजपा अमरावती जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या हस्ते तसेच अकोट विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे, दर्यापुर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रमेश बुंदीले व अंजनगाव सुर्जी शहराचे माजी नगराध्यक्ष ॲड.कमलकांत लाडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते सुनिल उत्तमराव माकोडे यांची अंजनगाव सुर्जी शहर सचिव पदी नियुक्तीची घोषणा करण्यात आली असुन, त्यांना मान्यवरांच्या वतीने पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्याबद्दल सुनिल माकोडे यांनी खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार प्रकाश पाटील भारसाकळे, माजी आमदार रमेश बुंदिले व माजी नगराध्यक्ष ॲड.कमलकांत लाडोळे, सरचिटणीस डॉ.विलासराव कविटकर, दर्यापूर विधानसभा प्रमुख गोपाल चंदन, ॲड.पद्माकर सांगोळे, भाजपा शहराध्यक्ष उमेश भोंडे, तालुकाध्यक्ष रविकुमार गोळे, यांचे शतश: आभार मानले तसेच अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी आपण सदैव तत्पर राहणार असल्याचे सुनिल माकोडे या़ंनी याप्रसंगी प्रतिपादन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातील समस्त आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. सुनिल माकोडे यांच्या निवडीमुळे विविध स्थरावरुन त्यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

error: Content is protected !!