ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

खासगी कोचिंग क्लासेस मध्ये 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

खासगी कोचिंग क्लासेस मध्ये 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही

खासगी कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारने नवीन गाईडलाईन्स जाहीर केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन गाईडलाईन्सनुसार, यापुढे कोचिंग क्लासेस 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नाहीत. तसेच चांगले गुण किंवा रँक मिळवून देण्याची हमी देण्यासारखी दिशाभूल करणारी आश्वासनेही देऊ शकणार नाहीत.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटना, आगीच्या घटना, कोचिंग संस्थांमधील सुविधांचा अभाव तसेच त्यांनी अवलंबलेल्या शिकवण्याच्या पद्धतींबाबत सरकारकडे आलेल्या तक्रारींनंतर मंत्रालयाने ही गाईडलाईन्स तयार केली आहेत.

गाईडलाईन्समध्ये काय सांगण्यात आलं आहे?
गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आलं आहे की, कोणतीही कोचिंग क्लासेसला पदवी नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती करता येणार नाही. कोचिंग क्लासेस पालकांना विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी किंवा चांगली रँक मिळवून देण्याची किंवा चांगल्या गुणांची हमी देण्यासाठी दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत. क्लासेस 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाहीत.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना, आगीच्या घटना, कोचिंग क्लासेसमध्ये सुविधांचा अभाव तसेच त्यांनी अवलंबलेल्या शिकवण्याच्या पद्धतींबाबत सरकारकडे आलेल्या तक्रारींनंतर मंत्रालयाने ही गाईडलाईन्स तयार केली आहेत.

“कोचिंग इन्स्टिट्यूटची एक वेबसाइट तयार करावी. ज्यामध्ये शिक्षकांची पात्रता (शिक्षण), अभ्यासक्रम, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृहाची सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क याची तपशीलवार माहिती असावी,” असे गाईडलाईन्समध्ये म्हटले आहे. तसेच वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवर शैक्षणिक दबाव कमी कसा करता येईल, यासाठी क्लासेसने पावले उचलली पाहिजेत आणि त्यांच्यावर अनावश्यक दबाव न आणता वर्ग चालवावेत, असंही गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आलं आहे.

error: Content is protected !!