ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

युक्रांदच्या विद्यार्थी आघाडी  जिल्हाध्यक्षपदी बेद्रे अलका यांची निवड

युक्रांदच्या विद्यार्थी आघाडी  जिल्हाध्यक्षपदी
बेद्रे अलका यांची निवड
बीड प्रतिनिधी – युवक क्रांती दल, सामाजिक, राजकीय भूमीका असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या विचारांनी प्रेरित असणार्‍या संघटनेच्या विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्षपदी  बलभीम महाविद्यालयाची विद्यार्थीनी बेद्रे अलका यांची निवड करण्यात आली आहे.
युक्रांद ही अहिंसा, सत्याग्रह, अन्यायविरुद्ध वाचा फोडणारी संघटना आहे. रेल्वे, शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला, बेरोजगार यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने युक्रांदने केली आहेत. अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले.
विद्यार्थी आघाडी बीड जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात युक्रांदचे केंद्र स्थापन करणार आहे. विद्यार्थी फीस, तासिका, शिष्यवृत्ती, विद्यार्थिंनी सुरक्षा या विषयावर काम करणार आहे.
या निवडीबद्दल युक्रांदचे संस्थापक अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी, अप्पा अनारसे, जांबुवंत मनोहर युक्रांदचे जिल्हाध्यक्ष डॉ.पंडीत तुपे, बाळासाहेब कळसाने, प्रा.शेख अमर, प्रा.भिमाशंकर यादव, नितीन चव्हाण, शिवलींग प्रभाळे आदींनी अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!