ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

श्री.संत गजानन महाराज मंदिर छाया कॉलनी येथील श्रीमद् भागवत कथेच्या मंडपाचे भूमिपूजन संपन्न

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधि;

अमरावती- श्री.संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाच्या पावन पर्वावर छाया कॉलनी येथील गजानन महाराज मंदिर येथे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन 25 फेब्रुवारी 2024 ते 3 मार्च 2024 यादरम्यान करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने श्रीमद् भागवत कथेच्या मंडपाचे भूमिपूजन प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक तथा ज्येष्ठ संपादक पत्रकार, विजय ओडे, मंदिराचे सचिव प्रशांत पाटील यांच्या हस्ते तसेच परिसरातील सर्व गजानन महाराज भक्तांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. या श्रीमद् भागवत कथेमध्ये अनेक नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन, भारुड भजन संध्या, भव्य मिरवणूक व प्रगट दिनाच्या दिवशी भव्य दिव्य महाप्रसाद यासह अनेक कार्यक्रम या श्रीमद् भागवत कथेच्या सप्ताह मध्ये होणार आहे.

या मंडप भूमिपूजनाच्या वेळी ज्येष्ठ संपादक पत्रकार विजय ओडे यांच्यासह मंदिराचे अध्यक्ष विनोद गुहे, सचिव प्रशांत पाटील, उपाध्यक्ष रामभाऊ शेगोकार, मंदिराचे ट्रस्टी ज्ञानेश्वर कळसकर, उमेश राजुरकर, नानाभाऊ काठोळे, सुनील कळसाईत, निलेश चौधरी, मोहन खरड, रवी इंगोले, अमोल वाढोनकर, गोपाल कोल्हे, विजय थोरात, राजू इंगोले, गौरव शेगोकर, सुमित रोहनकर, गौरव काठोले, प्रज्वल खैरे, नूतन सहारे, रत्नम शेगोकार सह मोठ्या संख्येने गजानन महाराज भक्त व परिसरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!