ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

बाल‎ आनंद मेळावा: जामखेड येथे आनंद मेळाव्यात‎ खाद्यपदार्थ, वस्तूंची विक्री

बाल‎ आनंद मेळावा: जामखेड येथे आनंद मेळाव्यात‎ खाद्यपदार्थ, वस्तूंची विक्री

विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख शिक्षण मिळावे – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे

जामखेड प्रतिनिधी;-विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण-तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा.तसेच विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख शिक्षण मिळावे. वर्गात मिळालेल्या शिक्षणाचे दैनंदिन जीवनात विद्यार्थ्याला करता यावे ,यासाठी आनंदी बाजार हा उपक्रम खूप महत्वाचा आहे. अशा स्तुत्य उपक्रमाचे पद्धतशीर व नियोजनपूर्वक आयोजन केल्याबद्दल मराठी मुले-मुली जामखेड शाळेचे भरभरून कौतुक करत समाधान व्यक्त केले.

जामखेड येथील जिल्हा परिषद शाळेत दि.२२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०..०० वाजता बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला जामखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ‌शाळा व्यवस्थापन समिती मुले अध्यक्ष नाशिक सय्यद उपाध्यक्ष संतोष तवटे , सदस्य निलेश गायकवाड,शाळा व्यवस्थापन समिती मुली अध्यक्ष संतोष गिरी आदी शिक्षक वृंद,पालक विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचे स्वागत मुले विभाग चे मुख्याध्यापक संजय कर्डिले व मुलीं विभाग चे मुख्याध्यापक दत्तात्रय यादव व शिक्षक वृंदांनीक केले.
विद्यार्थ्यांना ‘कमवा‎ व शिका’ याची जाणीव होण्यासह‎ विविध व्यवसाय व व्यवहाराची‎ माहिती व्हावी, यासाठी हा बाल‎ आनंद मेळावा घेण्यात आला.‎ आनंद मेळाव्यात विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी‎नी अतिशय उत्साहाने विविध खाद्यपदार्थ पदार्थ व वस्तूचे‎ स्टॉल लावले होते. यात पाणीपुरी,‎ भेळ, पालेभाज्या, गुलाब जामुन,‎ आप्पे, कचोरी, वडापाव, इडली,‎ मसाला पापड, भजे, पॅटिस आदी‎ खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.
याप्रसंगी आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी प्रत्येक दुकानांना भेट देवून बाजार खरेदी केला तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
आनंदी बाजारात आनंद नगरी भरविण्यात आली होती. यामध्ये मिकी माऊस, झम्पिंग झप्पांग चा आनंद घेताना बाल विद्यार्थ्यांचा आनंद शिगेला पोहोचला होता आनंद नगरीचा सर्व पालक, शिक्षक, माता पालक व उपस्थित सर्व ग्राहकांनी मनसोक्त आनंद घेतला. आजचा दिवस सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा ठरला.

आनंदी बाजार यशस्वी व्हावा म्हणून मराठी मुले शाळेचे शिरीष कदम, सागर माकुडे, नितीन मोहोळकर, श्रीमती म्हेत्रे, श्रीमती धाऊड, श्रीमती पोले, श्रीमती वराडे, श्रीमती ससाणे, श्रीमती साबळे, श्रीमती साळे तसेच मराठी मुली शाळेचे श्रीमती बडे , निशा कदम , श्रीमती सिद्धेश्वर , श्रीमती कानडे, श्रीमती पवार , श्रीमती अर्चना भोसले, श्रीमती झोरे, श्रीमती खेडकर, श्रीमती जाधव व जोगदंड सर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!