ब्रेकिंग न्युज
आळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोलसुशी येथे आज महंत शिवाजी महाराजांचे काल्याचे किर्तनगेवराई येथे महाविकास आघाडीच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा- पुजा मोरेतब्बल २६ वर्षांनी एकत्र, उखाणा विशेष आकर्षण ठरले, निवडणुकीचा विसर मैत्री पुढे, कुठलीही राजकीय चर्चा नाहीजामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूड हिंदी लोरी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनात यशस्वी पदार्पणमराठवाड्याच्या दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी पंकजाताईंना निवडून द्या – बबनराव लोणीकरआम आदमी पार्टीने पिंपळनेर येथे  डफड वाजून ढोर टु डोर केला प्रचारपाथरवाला बु. येथे मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागतबीड लोकसभेची निवडणूक अहंकारा विरूद्ध सामान्य माणसाची लढाई – माजी मंत्री सुरेश नवले

अंजनगाव नगरीत भव्य शिवजयंती महोत्सव साजरा

झाकी शोभायात्रेने दुमदुमली अंजनगावनगरी

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधि;

अंजनगांव सुर्जी येथे शिवजयंती महोत्सवानिमित्त मराठा सेवा संघ, शिवजयंती मोहोत्सव समीती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद व इतर समविचारी संघटनांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीही शिवजयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी अंजनगाव सुर्जी नगरीमध्ये स्थानिक गणेश नगर येथून दुपारी ३ वाजता भव्य शोभायात्रा निघून त्यात मोठ्या प्रमाणात तरूण मंडळी, महिला व आबालवृद्ध शोभायात्रेत सहभागी होते. शोभायात्राचे स्वागत ठीकठीकानी नागरिकांकडुन करण्यात आले. यात पान आटाई येथे मुस्लिम समाजाकडुनही शिवरायांचे पुतळ्यास हारार्पन घालुन मानवंदना देण्यात आली. शोभायात्रा गणेश नगर येथून ओम चौक, काठीपुरा, कोकाटखेल,शनिवारा पेठ, पानअटाई, गुलजारपुरा मार्गे नगरपरिषद विद्यालयाच्या प्रांगणापर्यंत झाकी, ताशा, बॕन्ड पथकाच्या तालावर मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते, सायंकाळी ६ वाजता प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन आठवडी बाजारस्थित नगर परिषद विद्यालयाच्या प्रांगणात “छत्रपती शिवराय व देशातील आजची लोकशाही ” या विषयावर व्याख्यानावर गुरुकुंज मोझरी येथील शिवचरित्र अभ्यासक व प्रभावी व्याख्याते रवि मानव यांनी संबोधन केले.

समारंभाचे उद्घाटन कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष ऊद्योजक सुरेंद्र टांक यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन शिवश्री अरविंद गावंडे, प्रमुख उपस्थितीत शिवश्री प्रमोद दाळु, नितेश वानखडे, अश्वीन चौधरी, मनोहर कडू डॉ. राजेंद्र सरोदे, बाळासाहेब गोंडचवर, प्रभुदास हागोणे, डॉ. अब्दुल राजीक, सुधीर अरबट, सुरेशदादा साबळे, डॉ. विशाल देशमुख, प्रदीप येवले, डॉ. सुधिर कुकडे, संजय सरोदे, प्रविण नेमाडे, सोपान साबळे, मनोज मेळे, शरद कडु, वैशाली टांक, सारीका मानकर तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून होते,यावेळी आयोजनात सहभागी झाकी स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना रोख बक्षीस देऊन सन्माणीत करण्यात आले. शिवजयंती मोहत्सवाचे आयोजन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड,संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद, विर भगतसिंह वीद्यार्थीं परीषद, समविचारी संघाटना तथा सर्व शिवप्रेमी बंधू-भगिनी च्या वतीने प्रचंड उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सोपान साबळे यांनी तर आभारप्रदर्शन शिवमती सारीका मानकर यांनी केले.

error: Content is protected !!