ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवारत्न पुरस्कार जामखेड येथील कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांना जाहीर

महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवारत्न पुरस्कार जामखेड येथील कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांना जाहीर

जामखेड प्रतिनिधी;-महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन ,दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय पुरस्कार २०२४ पत्रानुसार

राज्यात कृषी व कृषी संलग्न क्षेत्रात तसेच फुलो उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले .
महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागातून राजेंद्र भाऊसाहेब सुपेकर( जामखेड तालुका कृषी अधिकारी) यांना पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार २०२२ जाहीर झाला आहे.
श्री. सुपेकर हे १ सप्टेंबर २०२१ पासून जामखेड तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जामखेड तालुक्यासह इतरही तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती विषयक येणाऱ्या अडचणी सोडवतात, सोशल मीडियाचा शेतीसाठी प्रभावी उपयोग , शेतीविषयक योजनांची माहिती लोकापर्यंत पोहोचविणे व योजनांचा लाभ देणे, विविध पिकावरील कीड रोगराई नष्ट करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे, शेती पशु संवर्धन ,फळबाग , कडधान्य याविषयी विविध जनजागृती कार्यक्रम घेत असतात, तसेच प्रत्यक्ष विविध भागांना भेटी देऊन मार्गदर्शन केले आहे. जामखेड तालुक्यातील कर्तव्यदक्ष शेतकरी हिताचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

त्यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये शेतीविषयक केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेऊन कृषी सेव रत्न पुरस्कार जाहीर केला आहे.
श्री. सुपेकर यांनी आजवर कोकण विभागात रत्नागिरी मध्ये मंडळ कृषी अधिकारी, संगमनेर तालुक्यात तळेगाव मध्ये मंडल कृषी अधिकारी, श्रीगोंदा तालुका काष्टी मध्ये फलोत्पादन अधिकारी, कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे मंडल कृषी अधिकारी, छ संभाजीनगर येथे फळ प्रक्रिया व संस्करण प्रशिक्षण केंद्र येथे तंत्र अधिकारी, २०१३ मध्ये नियुक्ती कर्जत तालुका कृषी अधिकारी,२०१८ मध्ये नियुक्ती आष्टी तालुका कृषी अधिकारी, म्हणून काम पाहिले आहे. व सध्या ते १ सप्टेंबर २०२१ पासून जामखेड तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या जामखेड तालुक्याचे कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर महाराष्ट्राचा कृषी सेवा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल जामखेड तालुक्यातून अभिनंदनच वर्षाव होत आहे

error: Content is protected !!