ब्रेकिंग न्युज
जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

पुरवठा निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याची घडली घटना

धनंजय कुलकर्णी -उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

पुरवठा निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याची घडली घटना

बीड (प्रतिनिधी):-आरोग्य भरती, म्हाडा परीक्षा, कोतवाल भरती, पोलीस भरती घोटाळ्याने बीड जिल्हा गाजत असतानाच, पुन्हा एकदा पुरवठा निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याने बीडमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुरवठा निरीक्षक पदाच्या परीक्षा सुरू आहेत. याचदरम्यान, पुरवठा निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे.

पुरवठा निरीक्षक पदासाठी बीड शहरातील चराटा फाटा येथे असणाऱ्या स्वामी विवेकानंद कॉम्प्युटर्स या ठिकाणी परीक्षा सुरू होती. ही परीक्षा देताना ब्लूटूथ आणि कॉपी करण्यासाठी लागणारे वॉकीटॉकी ही पकडण्यात आलेल्या आरोपीकडे सापडल्याची माहिती एमपीएससी समन्वयक राहुल कवठेकर यांनी दिली आहे

error: Content is protected !!