ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक ,दै .महाराष्ट्र सूर्योदय

महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा

नागपूर(प्रतिनिधी) :- महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या ४८ तासांत पावसाची हजेरी दिसून येणार आहे.

महाराष्ट्रात गेले दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भात काही जिल्ह्यांत गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांचे गारपीटीसह झालेल्या या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. आता नव्याने ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ सक्रीय झाला असून राज्यातच नाही तर संपूर्ण देशात हवामानात मोठे बदल घडून येत आहे. त्यामुळे २८ व २९ फेब्रुवारीला अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

विदर्भासह मराठवाड्यात पुन्हा एकदा गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तराखंड आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी येत्या दोन-तीन दिवसांत ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!