ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

बालविवाह मुक्त गाव निर्माण करण्याचा सावित्रींच्या लेकीचा संकल्प.

बालविवाह मुक्त गाव निर्माण करण्याचा सावित्रींच्या लेकीचा संकल्प.


वडवळ येथे साविञींच्या लेकीचा सन्मान कार्यक्रम.


 लातूर- महिला सक्षमीकरणातून बाल हक्क सुरक्षित कार्यक्रम यांच्या माध्यमातून जागतिक महीला दिनानिमित्त चाकूर तालूक्यातील वडवळ नागनाथ  येथे कलापंढरी संस्थेच्या वतीने “सन्मान आजच्या सावित्रीचा” हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमामध्ये महिलांनी बालविवाह मुक्त गाव करण्याचा निर्णय घेतला.
आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या कल्पना महाजन या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या पार्वती सूर्यवंशी, कल्पना कसबे यांची उपस्थिती होती, सामाजिक कार्यकर्ते माया सोरटे यांनी बालविवाह बालमजुरी बाल लैंगिक शोषण यांचे दुष्परिणामांची मांडणी करून बाल शोषण मुक्त गाव करूया असे आवाहन केले. अरुनिमा किशोरी गटाचे अध्यक्ष वैष्णवी मस्के यांनी एकच दिवस महिलांचा सन्मान करून चालत नाही तर प्रत्येक दिवशी महिला, व किशोरींचा सन्मान करावा असे प्रतिपादन केले. तर सामाजिक कार्यकर्त्या कल्पना महाजन यांनी लघु उद्योगातून महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे असे आवाहन केले तर एकजूट महिला बचत गटाच्या अध्यक्ष पार्वती कांबळे यांनी आपल्या गीतातून एकीने एक एक निर्भीड साऱ्या बना ग  असा  संदेश दिला.गीताच्या माध्यमातून  दिला
या कार्यक्रमात रंजना बेरकिळे ,मीना नवने अर्चना सुर्यवंशी,सुकुमार कांबळे,शांता आलूरे यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे सुञसंचलन वैष्णवी  मस्के यांनी केले तर आभार फराना शेख यांनी  मानले.या वेळी गावातील महीला व किशोरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
error: Content is protected !!