ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

लिंबागणेश येथील संवेदनशील मतदान केंद्राचा पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आढावा घेतला:- डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश येथील संवेदनशील मतदान केंद्राचा पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आढावा घेतला:- डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:- बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुक दरम्यान प्रभाग क्रमांक २ मधील सरपंच पदाचे दावेदार असणा-या अँड.गणेश वाणी यांच्या” शिट्टी” चिन्ह असलेल्या बटणावर मशिनमध्ये फेव्हिस्टीक टाकल्याचा प्रकार घडुन आला आला होता. संबंधित प्रकरणी केंद्र प्रमुखांच्या फिर्यादीवरून नेकनुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे दि.२३ डिसेंबर रोजी फेरमतदान करण्यात आले होते.आणि फेरमतदानात ४२ मते वाढली होती.यात बाळासाहेब जाधव विजयी झाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या संवेदनशील मतदान केंद्राचा आढावा घेण्यासाठी आज दि.१६ शनिवार रोजी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी गोल्डे,नेकनुर पोलिस स्टेशनचे प्रभारी सपोनि चंद्रकांत गोसावी यांनी लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत फेव्हीस्टीकची घटना घडलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करत ग्रामस्थांकडुन माहिती घेतली.

लोकशाहीला मारक घटना घडली तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करू:- नंदकुमार ठाकूर ( पोलिस अधीक्षक बीड)

लिंबागणेश जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतल्यानंतर गावातील प्रमुखांची ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठक घेऊन आगामी  निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आणि लोकशाहीला मारक असुन निवडणूक आयोगाने याबाबतीत कठोर धोरण अवलंबिले असुन लोकशाहीला मारक घटनांच्या बाबतीत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येईल अशी तंबी देत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करणारांची गय केली जाणार नाही त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.यावेळी डॉ.गणेश ढवळे, सरपंच बालासाहेब जाधव, ग्रामसेवक वीर, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, ग्रामपंचायत सदस्य दामोदर थोरात, समीर शेख, जीवन मुळे, सुखदेव वाणी, राजेभाऊ गिरे, अँड.गणेश वाणी, विक्रांत वाणी, संतोष वाणी, सुरेश निर्मळ,दादा गायकवाड, रामचंद्र मुळे, पत्रकार हरिओम क्षीरसागर आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!