ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

आ.प्रकाशदादा सोळंके म्हणजे, विकासाचा महामेरू,अवघा जना आधारू…

आ.प्रकाशदादा सोळंके म्हणजे, विकासाचा महामेरू,अवघा जना आधारू…

वडवणी शहरावर सरकारकडून “गुड न्यूजचा” वर्षाव..

बहूप्रतिक्षीत एमआयडीसीचे नोटिफिकेशन निघालं

विकासकामांसाठी तब्बल ५६ कोटींचा निधी प्राप्त.

वडवणी;-वडवणी तालुक्यातील जनतेच्या मुख्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके हे सदैव तत्पर असतात. चार दिवसांपूर्वीच त्यांनी वडवणी नगरपंचायत हद्दीतील विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. पुन्हा एकदा आ.प्रकाश सोळंके यांनी तालुक्यातील जनतेचे हित लक्षात घेता वडवणी तालुक्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ नुसार साधण्यासाठी एक प्रशस्त एमआयडीसी असावी म्हणून त्यांनी याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करुन स्वतः मंत्रालयीन कामकाजात लक्ष घालून प्रशासनातील संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून हे महत्त्वाचे काम करुन घेतलेले आहे. त्यामुळे आता वडवणीकरांसाठी बहूप्रतिक्षीत असलेल्या एमआयडीसीचे नोटिफिकेशन निघालेले आहे व आजवर वडवणी शहरातील विकासकामांसाठी तब्बल ५६ कोटींचा निधी देखील प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे वडवणी शहरातील बाजारतळावर उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलावही लवकरच होणार असून बाजार तळातील व्यापारी संकुलातील हे गाळे व्यावसायिकांना ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. एकंदरीतच वडवणी शहरावर सरकारकडून गुड न्यूजचा एक प्रकारे वर्षावच झाला असून बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले याप्रमाणे आमदार प्रकाश दादा सोळंके हे जे बोलतात तेच करतात हे पुनश्च एकदा अधोरेखित झाले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना आ.प्रकाश सोळंके यांनी सांगितले की, माजलगाव विधानसभा मतदारसंघातील वडवणी तालुक्यामध्ये उद्योग व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना आपला उद्योग पुढे पुढे घेवून जाण्यासाठी बळ मिळावे म्हणून स्वतंत्र औद्योगिक वसाहत असावी असे सुरुवातीपासून वाटत होते. आपण यासाठी सदर प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी पाठपुरावा केला. वडवणी तालुक्यातील पुसरा शिवारातील जमीन संपादन करण्यासाठी निश्चित केली. या शिवारातील जमीन गट क्रमांक २७९ मधील ५० हेक्टर क्षेत्र या औद्योगिक वसाहतीसाठी उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ क्रमांक आयडीसी २०२४ पत्र क्रमांक १४४ उ.१४ महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ (१९६२ चा महा.३) चे कलम २, खंड (ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र शासन याव्दारे यासोबत जोडण्यात आलेल्या अनुसूचित उल्लेख केलेले मौजे पुसरा तालुका वडवणी जिल्हा बीड येथील गट क्रमांक २७९ पै.क्षेत्र ५० (हे.आर.) औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करीत आहे. या क्षेत्राची चतु:सिमा उत्तरेस – मौजे पुसरा गट क्रमांक २३८, २३९, २४०, २६५, २६६, २७१, २७२, २७७, २७८ दक्षिणेस – मौजे पुसरा गट क्रमांक १८१, १८३, १९७, १९८, १९९, २१३, २२१, २२३, २२४, २२५, २२६ पुर्वेस – मौजे पुसरा येथील गट क्रमांक ११९, १८३, १८२, १८१ व तिगांव रस्ता त्याचबरोबर पश्चिमेस – मौजे पुसरा गट क्रमांक २३०, २३१, २३४, २३५, २३६, २४०, २४१, २४२, २७२, २७३ अशा प्रकारची चतु:सिमा आहे.
वरील गट नंबर मधील सदरची जमीन वडवणी तालुक्याच्या एमआयडीसी साठी आरक्षित करण्यात आलेली आहे.

चौकट…
वडवणी शहरातील विकासकामे

– नगरपंचायत प्रशासकीय इमारत ५ कोटी
– बुध्दविहार १ कोटी
– राम मंदिर सभागृह ३५ लाख
– बिचकूलदरा सभागृह २५ लाख
– सती सामत मंदिर सभागृह २५ लाख
– दत्तमंदिर तांडा, दत्तमंदिर सभागृह २५ लाख
– स्वामी समर्थ मंदिर सभामंडप २५ लाख
– बिरोबा मंदिर सभा मंडप २० लाख
– काळा हनुमान मंदिर सभामंडप १० लाख
– हिंगलाजमाता मंदिर सभामंडप १७ लाख
– विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडप १७ लाख
– शेरीतांडा सभामंडप १७ लाख
– ठाकरवाडा तांडा सभामंडप १० लाख
– विठ्ठल रुक्मिणी तांडा सभामंडप १० लाख
– संत शिरोमणी सभामंडप १० लाख
– दत्त मंदिर सभामंडप १० लाख
– शहरातील प्रमुख रस्ते २० कोटी
– प्रभागातील इतर रस्ते व नाल्या १६ कोटी
– शादीखाना १ कोटी
– बाजारतळ विकसित करणे १ कोटी
– जलशुध्दीकरण केंद्र संरक्षण भिंत व स्टोअर रुम ९० लाख
– वडवणी शहरात गार्डन २ कोटी
– वडवणी शहरात संग्रहालय, वाचनालय व जिम बांधकाम ५ कोटी ५० लाख
– संत भगवानबाबा मंदिर सभामंडप २० लाख
– दत्त मंदिर सभामंडप १० लाख
– संत भीमसिंहबाबा मंदिर सभामंडप २० लाख
– विश्वकर्मा मंदिर सभामंडप १० लाख
असे एकूण ५६ कोटी रुपयांचे निधी प्राप्त झालेला आहे. व शहरातील आणखी विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचे प्रस्तावित कामे असून वडवणीकरांना दिलेले १०० कोटी रुपयांचे आश्वासन लवकरच पूर्ण होईल अशी माहिती नगराध्यक्ष शेषेराव जगताप यांनी दिली आहे.

चौकट…

लवकरच उपाययोजना लागु करु :-आ.प्रकाश सोळंके

वडवणी तालुक्याच्या विकासात भर देण्याबरोबरच शहर व तालुक्यातील व्यापारी, लघुउद्योजक, व्यवसायीकांमध्ये भरभराटी व्हावी व तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळावं या प्रमुख उद्देशाने या तालुक्याची औद्योगिक वसाहत एमआयडीसी साठी मंजुरी मिळवून घेतली आहे. लवकरच याची उभारणी करण्यासाठी उपाययोजना लागु करु असं मत विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले.

चौकट…

आ.प्रकाशदादा विकासाचे मॉडेल आहेत:- शेषेराव जगताप (फोटो)

वडवणी शहरातील विविध विकास कामांसाठी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी भरभरुन निधी उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत तब्बल ५६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या आशीर्वादाने वडवणी शहरात नाविन्यपूर्ण विकासाचा उपक्रम या निधीतून राबविला जाणार आहे. शहरातील रस्ते, बुध्दविहार, सभामंडप, शादीखाना, नाली, रस्ते, संग्रहालय, वाचनालय, जिम, गार्डन, बाजारतळ विकसित करणे ही कामे दर्जेदार केली जाणार आहेत. आता त्यांनी वडवणी शहरातील व्यापारी बांधवांच्या त्यांच्या उद्योग, व्यवसाय वाढीसाठी व तालुक्यातील युवक उद्योजकांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी वडवणी तालुक्यासाठी नव्याने एमआयडीसी निर्माण होत आहे. पुसरा येथे ही एमआयडीसी होत असून तसे शासकीय नोटिफिकेशन निघाले आहे. वडवणी तालुका हा यामुळे एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवण्याचे काम होत आहे. आ.प्रकाशदादा सोळंके हेच वडवणी तालुका विकासाचे मॉडेल आहेत असे मत नगराध्यक्ष शेषेराव जगताप यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!