ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

पारंपरिक साखरगाठी व्यवसायाला घरघर मजुरीसह मालाचे दर वाढल्याचा परिणाम

पारंपरिक साखरगाठी व्यवसायाला घरघर
मजुरीसह मालाचे दर वाढल्याचा परिणाम

शेवगांव;- काही दिवसांवर होळी आणि गुढीपाडव्याचा सण आला असून बोधेगाव (तालुका शेवगांव) येथील व्यावसायिकांनी साखरगाठी तयार करण्यास प्रारंभ केला आहे परंतु कच्च्या मालासह मजुरीचे दर वाढल्याने अनेक व्यावसायिकांनी त्यातून अंग काढले आहे वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक सणात वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचे वेगळे महत्त्व असते होळी आणि गुढीपाडव्याच सण उन्हाळ्यात येत असल्याने शरीराला थंडावा मिळण्यासाठी साखरगाठीचे सेवन केले जाते सध्या हे सण जवळ आल्याने साखरगाठी तयार करण्यास प्रारंभ झाला आहे माञ कच्च्या माल व मजुरीचे दर दोनशेपासून चारशे रुपयांपर्यंत वाढल्याने या पारंपरिक व्यवसायाला घरघर लागल्याचे चित्र आहे सध्या बोधेगावात एकच आचारी साखरगाठी बनवत असून आतापर्यंत १६ क्विंटल गाठी बनविण्यात आल्या आहेत गाठीचा एककिलोचा किरकोळदर शंभर व घाऊक दर ८० रुपये आहे बाजारात मशिनद्वारे बनविण्यात आलेल्या गाठ्या आल्या असतानाही ग्राहक हाताने बनविलेल्या गाठ्यांना जास्त पसंती देत आहेत माञ खर्च वाढल्याने पारंपरिक पद्धतीने गाठी बनविण्याचा व्यवसाय थंडावला आहे
चौकानात
एक व्विंटलपासून ९० किलो साखरगाठी
एक क्विंटल साखरेपासून ९० किलो साखरगाठी तयार होते यासाठी साखर दूध पावडर लाकडी साचे दोरा गठिला पांढराशुभ्र रंग येण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो लाकडी साचेतुन दोन व्विंटल साखरगाठी बनविण्यासाठी एक पूर्ण दिवस दोन मुख्य कारागीर आणि चार महिला कामगार लागतात
चौकानात
होळी सणापासून साखरगाठीची देवाणघेवाण तसेच उन्हाळ्यात उण लागु नये म्हणून हिचा खाण्यासाठी उपयोग होत असल्याने तिला मार्च एप्रिल पर्यंत मागणी असते सुरू हैणारे कारखाने आणि ग्राहकांची मागणी पाहून मी १० मार्च पासुनच साखरगाठीचा बनावण्याचा कारखाना सुरू केला आहे कोणतेही केमिकल न वापरता गाठी बनविण्यात आल्याने हिला मागणी जास्त आहे
शौकत पठाण बोधेगाव आचारी

error: Content is protected !!