ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

लोकसेना राज्यात लोकसभेच्या दहा जागा लढ़वणार- ॲड. प्रा. इलियास इनामदार

लोकसेना राज्यात लोकसभेच्या दहा जागा
लढ़वणार- ॲड. प्रा. इलियास इनामदार
बीड प्रतिनिधि: लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणूकीमध्ये राज्यातून महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला दहा जागा तुमच्याच पक्षातील पदाधिकारी यांना द्यावे अशी मागणी लोकसेनाने इंडिया गठबंधन यांच्याकड़े केली होती परंतु या मागणीकड़े चक्क दुर्लक्ष करण्यात आल्याने नाविलाज लोकसेना राज्यात लोकसभेच्या दहा जागेवर निवडणूक लढ़वणार आहे. व या विषयी राज्यातील इच्छुक उमेदवारांशी चर्चा व निवड सुरु असून लवकरच यादी जाहिर करणार अशी माहिती लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी दिली आहे. निवडणूक मैदानात उतरण्याचे कारण
ज्या कांग्रेस मित्रपक्षाला समाजाने सत्तर वर्षापासून सेक्युलर पक्ष म्हणून भरभरून मते दिली त्या कांग्रेसने समाजाच्या अनेक समस्येकड़े दुर्लक्ष केले जसे शिक्षण आरक्षण व संरक्षणा सारखे गंभीर विषय असतील व कधी समाजाला सत्तेत सामाऊन घेतले नाही, अनेक सेक्युलर नेते ईडीच्या भीतीने व निवडणूक टिकेटच्या लालसेपोटी भाजपा मोदीच्या मांडीवर जाऊन बसलेले आपणास दिसेल. व दुसरीकडे भाजपाने देशात विकासाच्या नावाने फ़क़्त जातीयवाद वाढवला स्विस बँकेतला काळा धन भारतात परत आणू व प्रत्येक भारतीयांच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख टाकू हे फ़क़्त भाजपाची भपकेबाजी निघाली देशातील भ्र्ष्टाचार संपवणारा भाजपा केंद्रीय तपास यंत्रणेच्या आड़मध्ये मोठमोठाल्या उद्योगपती व राजकीय नेत्यांकडून खंडणी वसूल करणारा पक्ष निघाला एलेक्ट्रोल बांड घोटाळा हा याचेच उदा. आहे आपण ऐकतो स्वच्छ प्रतिमेचे कैरैक्टर सर्टिफिकेट वाटणाऱ्या भाजपाने देशातील सर्व भ्र्ष्टाचारी नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश देवून जणू भ्रष्टाचार पार्टीची स्थापना केली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे विरोधकांना सपंवण्याचे कटकारस्थान भाजपाने केले आहे मोदी सरकार देशातील युवकांना करोडो रोजगार, नौकऱ्या देणार होती, मोफत शिक्षण देणार होती शेतकऱ्याचे कर्जे माफ करणार होती, महगाई कमी करणार होती परंतु याकडे लक्ष न देता भाजपाने फोडाफोड़ीचे राजकारण करुन देशातील राजकारण गढ़ुळ व गलिच्च करुन टाकले आहे. देशातील जनतेने ठरवावे की आपल्याला मोदी सरकार हवे का? भारत सरकार हवे कारण देश कोणी एक व्यक्ती चालवत नाही देश संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता व सामाजिक विचाराने चालतो परंतु नरेंद्र मोदी तानाशाही व हिटलरवादी धोरण राबवत आहे मग कशाला देशाला हुकूमशाह व अदानी अंबानीची भांडवलशाही पाहिजे सर्वांनी मिळून लोकशाहीचे भारत सरकार निवडून देवू असे राष्ट्रीय व सामाजिक आव्हान देशातील जनतेला लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी केले आहे.
error: Content is protected !!