ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

अॅड. सिस्टर हिरा पारखे महाराष्ट्राच्या आजच्या जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधि;

अंजनगाव सुर्जी- दरवर्षि नंबर वन न्युज चॅनल अमरावती व्दारा विविध क्षेत्रात कार्य करणा-या महिलांना त्यांच्या अतुलनिय कार्यासाठी देण्यात येणारा महाराष्ट्राच्या आजच्या जिजाऊ गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा नुकताच दिनांक 12 मार्च 2024 रोजी, डाॅ.पंजाबराव देशमख कृषि विद्यापीठ अकोला येथील विस्तार शिक्षण संचालनालय अकोला येथे पार पडला.

अॅड. सिस्टर हीरा पारखे ह्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सोशल सेंटर भंडारज येथे कार्यकारी संचालिका म्हणुन सद्या कार्यरत आहेत. त्या गेल्या 23 वर्षांमध्ये अमरावती, अकोला, ठाणे या तीन जिल्ह्यातील कतकारी, वारली, कोरकु, पारधी आणि इतर मागासवर्गीय मधील तळागाळातील गोरगरीब, निर्वासित लोकांच्या सर्वागीण विकासासाठी व सक्षमीकणासाठी त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी अहोरात्र कार्यरत राहिल्या आहेत. विस्थापितांना सक्षम करण्यासाठी त्यांनी गेल्या 23 वर्षात गोरगरिबांची अति उत्कृष्टपणे निस्वार्थ सेवा केल्याबद्दल त्यांना संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून महाराष्ट्राच्या आजच्या जिजाऊ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पुरस्कार वितरणाप्रसंगी डाॅ. उंदिरवाडे संचालक कृषि विस्तार शिक्षण संचालनालय डाॅ. पंजाबराव देशमुख कृषि विधापिठ अकोला, प्रकाश साबळे जि.प.माजी सदस्य अमरावती, डाॅ. दिलीप काळे माजी प्राचार्य समाजकार्य महा. बडनेरा, यांचे सह पौर्णिमा सवाई, इंजी मनोज जयस्वाल, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झिंगुबाई बोलके, गजानन कडु, दिपा तायडे, नितीन ऊभाड, प्रा. संजिव सलामेमा, सुहास मोरे, अश्विनी गीते, दिनेश सावरकर हे मंचावर ऊपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन नंबर वन न्युज चॅनल अमरावती चे नितीन मुळे यांनी केले.

error: Content is protected !!