ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

बीडचे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे व पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली करा-वसंत मुंडे         

बीडचे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे व पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली करा-वसंत मुंडे

 मुंबई प्रतिनिधी;- महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणुकी संदर्भात आचारसंहिता लागू झालेली आहे. बीडच्या जिल्हाधिकारी श्रीमती दिपा मुंडे-मुघोळ ह्या पदावर कार्यरत असून त्यांचे सासर कन्हेरवाडी, ता. परळी, जि. बीड मतदार संघातील असून देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालु झाल्या आहेत. बीड लोकसभा मतदार संघा अंतर्गत परळी विधानसभा मतदारसंघात श्रीमती मुंडे जिल्हाधिकारी यांचे गाव आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात जिल्हाधिकारी पदावर काम पहाता येत नाही. आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. तसे आदेश आचारसंहिते संदर्भात मार्गदर्शन सुचना व राजपत्र निर्गमित केलेले आहेत. कारण त्यांच्या कार्यकालामध्ये बीड मध्ये मोठी दंगल होऊन लोकप्रतिनिधींच्या घरावर हल्ले झाले, घरे जाळली, बेकायदेशीरपणे अनेक ठिकाणी परवानगी नसताना आंदोलने, बॅनरबाजी चालु असून सर्व नियमबाह्य कामे प्रशासनाला धरुन चालु आहेत. श्री. नंदकुमार, पोलीस अधिक्षक, हे अकार्यक्षम अधिकारी आहेत, बीड संवेदनशील लोकसभा मतदार संघ असून दंगल झाली त्यावेळेस पोलीसांनी बघ्याची भुमिका घेतली आहे. बेकायदेशीरपणे नंबर २ चे धंदे चालु आहेत, आचारसंहितेचा सर्वस्तरामध्ये बीड जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक मार्फत कायद्याचे उल्लंघन होत आहे, कायद्याचे नियंत्रण नाही, सत्ताधाऱ्याबरोबर त्यांचे लागेबंधे आहेत. निवडणूक ही अटीतटीची असून अकार्यक्षेम दोन्ही अधिकारी असल्यामुळे त्यांचे तात्काळ बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी मा. मुख्य निवडणूक आयुक्त भारत सरकार नवी दिल्ली , मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
error: Content is protected !!