ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

पर्यावरण टास्क फोर्सच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी शेतकरी नेते पाशा पटेल

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधि;

अमरावती- शेतकरी नेते आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची मुख्यमंत्र्यांच्या पर्यावरण टास्क फोर्सच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे, मुंबईसह राज्यात वाढत्या वायुप्रदुषणामुळे अनेक आराेग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत आणखी अभ्यास करण्यासाठी राज्याच्या आराेग्य विभागाकडून ‘टास्क फाेर्स’ ची स्थापना करण्यात आली.
हा टास्क फोर्स पृथ्वी आणि महाराष्ट्र राज्याला प्रभावित करणाऱ्या पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यांचा प्रभाव कमी करण्याचे मार्ग शोधण्यासाठी समर्पित आहे.

महाराष्ट्राच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आणि मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांची या समितीच्या सह अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर महाराष्ट्र राज्य हवामान कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच राज्य सरकारच्या विविध संबंधित विभागांचे सचिव टास्क फोर्सच्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत.

error: Content is protected !!