ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

पाण्यासाठी जामखेड तहसील कार्यालयावर महिलांचा आक्रोश करीत हंडा मोर्चा ;

पाण्यासाठी जामखेड तहसील कार्यालयावर महिलांचा आक्रोश करीत हंडा मोर्चा ;

जामखेड प्रतिनिधी;-ऐन उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आज बुधवार दि २७ मार्च शेकडो महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन जामखेड तहसिल कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला. या संतप्त महिलांनी तहसील कार्यालयात घुसून हांडे वाजून घोषणा देऊन संताप व्यक्त केला.

यावेळी आंदोलन करत्या महिलांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,जामखेड तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कर्जत/ जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना घरोघरी टँकरने मोफत पाणीपुरवठा करण्यात येत होता. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भागत होता. परंतु काही कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचे कारण सांगत प्रशासनाकडून सध्या हे टँकर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून मोठे हाल होत असून विशेषतः महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा‌ प्रश्न गंभीर बनला आहे. दुसरीकडं अद्यापही शासकीय टँकर सुरू झालेले नाहीत. मागील पाच वर्षांपासून कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत लोकांच्या मागणीनुसार
पाणीपुरवठा केला गेला. परंतु सध्या प्रशासनाकडून हे टँकर बंद करण्यात आल्याने लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. टँकर पुन्हा सुरु न झाल्यास लोकांमधील संतापाची तीव्रता अधिक वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे शासनास सहाय्यभूत ठरणाऱ्या ‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थे’च्या माधयमातून टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करणे आणि शासकीय टँकरही सुरु करुन लोकांच्या मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला पाणीपुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा विशिष्ट लोकांच्या राजकारणासाठी प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने येणाऱ्या राजकीय दबावाला बळी‌ पडून नागरिकांच्या हितासोबत असा खेळ खेळणं योग्य नाही. असेही निवेदनात म्हटले आहे. तहसील कार्यालयात जाऊन महिलांनी रिकामे हांडे वाजून आक्रोश निर्माण केला यावेळी महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला.दोन्ही आमदारांनी राजकारण न करता पाण्याचे टँकर सुरू करावे अशी मागणी यावेळी महिलांनी केली. ” पाण्याचा टँकर चालू झालाच पाहिजे,पाणी आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं,कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा यावेळी महिलांनी दिल्या. तुम्ही नेते मंडळी बिसलरी चे पाणी पिता व आम्हाला घरात प्यायला पाणी नाही,आंघोळीला पाणी नाही याचा विचार केला पाहिजे असेही संतप्त महिलांनी यावेळी ठणकावले. रमजानचा सण सुरू असताना आम्हाला घरात प्यायला व आंघोळीला पाणी नाही आमची सरकारने सोय करावी अशा प्रतिक्रिया मुस्लिम महिलांनी यावेळी दिल्या.
यावेळी विजयसिंह गोलेकर, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले,दत्तात्रय वारे, माजी सभापती राजश्री मोरे,राजेंद्र पवार , प्रकाश सदाफुले, सुधीर राळेभात, शहाजी राळेभात,राजेंद्र गोरे, दिपक पाटील,प्रकाश काळे,महारुळी सरपंच अंजली ढेपे,नरेंद्र जाधव, संचालक दत्तात्रय सोले पाटील, संतोष निगुडे, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली शिंदे, अनुराधा अडाले,प्रदीप शेटे, प्रशांत राळेभात, कुंडल राळेभात, वसीम सय्यद, युवा नेते महेंद्र राळेभात,सरपंच बाळासाहेब खैरे, संदीप राळेभात,प्रवीण उगले, काकासाहेब कोल्हे, गणेश म्हस्के,बापूसाहेब कार्ले, निलेश पवार, काकासाहेब चव्हाण,हरिभाऊ आजबे, रामहरी गोपाळघरे,डॉ.नरसाळे, अनिल बाबर,संजय डोके, श्रीकांत लोखंडे, चांँद तांबोळी, अमर चाऊस,महेश यादव, किरण कोल्हे, दत्ता डिसले, अनिल रेडे, सचिन शिंदे, अशोक पठाडे,महालिंग कोरे, युवराज उगले,सचिन डोंगरे, आकाश गागरे,अक्षय खिळे,अशोक गिते व आमदार रोहित पवार यांचे स्विय सहाय्यक सचिन मोकाशे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी महिलांचे निवेदन स्वीकारले.

error: Content is protected !!