ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात देखील नगरपालिकेकडून मुलभूत सेवा देण्यात कुचराई-शेख अझहर

मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात देखील नगरपालिकेकडून मुलभूत सेवा देण्यात कुचराई-शेख अझहर
नगर परिषद मुख्याधिकारी यांना विनंती करुन देखील हिंदु-मुस्लीम बांधवांना पाणी देण्यात नगर पालिकेकडून अनियमितताच
बीड (प्रतिनिधी) –  सद्यस्थितीत मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिला सुरु आहे यामध्ये मुस्लिम बंधु-भगिनी उन्हाळ्यातदेखील कडक उपवास करतात यामुळे त्यांना पाण्यासह, नादुरुस्त पथदिवे सुरळीत करुन द्यावे तसेच जुना बाजार ते बशीरगंज रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे अशा मागणींचे निवेदन शिवसंग्रामचे जिल्हाउपाध्यक्ष शेख अझहर यांनी रमजानचा महिना सुरु होण्यापुर्वीच नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती परंतू मुख्याधिकारी यांचा वचक कर्मचारी आणि संबंधित यंत्रणावर राहिला आहे का नाही असाच प्रश्न कोणतेही काम न केल्यामुळे उपस्थित होत आहे असे पत्रकाद्वारे शेख अझहर यांनी म्हटले आहे.
पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गत महिन्यापुर्वी बीड नगर परिषदेचे सीईओ यांना प्रत्यक्ष भेटून शहरातील नादुरुस्त पथदिवे आणि पाण्याच्या समस्येबाबत सांगितले. तसेच पुर्वी पाणी 3 घंटे सोडत होते परंतू 15 ते 20 दिवसांपासून ते देखील 1 तासच सोडत आहेत त्यामुळे मुस्लीम बांधवांचे पवित्र रमजानचे उपवास सुरु असताना तसेच हिंदु बांधवांना देखील पाण्याची उन्हाळ्यामध्ये गरज असतांना नगर परिषदेचे कर्मचारी हे मुख्याधिकारी यांनी सुचना केल्यावर सुद्धा पाणी सोडत नाहीत, नादुरुस्त पथदिवे सुरु करत नाहीत, तुंबलेल्या नाल्या काढत  नाहीत, मच्छरांचा फैलाव होवू नये म्हणून धुर फवारणी करत नाहीत त्यामुळे मुख्याधिकारी यांचा नगरपालिका कर्मचार्‍यावर अंकुश आहे का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. 8 दिवसाच्या आत दाऊदपुरा, मोमीनपुरा, इस्लामपुरा, मोहंमदीया कॉलनी, दिलावर नगरसह शहरातील पथदिवे आणि पाण्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास नगर परिषदेच्या दारात उन्हात बसून उपोषण करणार असल्याचे शेख अझहर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
error: Content is protected !!