ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

माजी विद्यार्थी मेळावा, पालक मेळावा  व पदवीदान समारंभ उत्साहात साजरा

माजी विद्यार्थी मेळावा, पालक मेळावा  व पदवीदान समारंभ उत्साहात साजरा


नेकनूर प्रतिनिधी;- माऊली विद्यापीठ केज संचलित, प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, नेकनूर येथे माजी विद्यार्थी मेळावा, पालक मेळावा व पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  माजी विद्यार्थी संघप्रमुख तुळजीराम शिंदे, महारुद्र वाणी, आजम पाशा तर  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ढास डी.के. उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी काळे रिद्धी, अंकिता मुळे व विजया हावळे यांनी  स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कलाणे के.के. यांनी केले. त्याप्रसंगी बोलताना ते  म्हणाले की, शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये सुसंवाद साधला जावा म्हणून माजी विद्यार्थी मेळावा पालक मेळावा व पदवीदान समारंभ अशा कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात येते. प्रमुख पाहुणे  तुळजीराम शिंदे  याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमामध्ये सातत्याने सहभाग नोंदविला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. माजी विद्यार्थी या महाविद्यालयातून उच्च पदावर जावेत व आपले नावलौकिक मिळवावे अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. तसेच प्रमुख मार्गदर्शन करताना महारुद्र वाणी सर म्हणाले की, पदवीदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा अनमोल असा क्षण असतो. अशा कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला पाहिजे. तसेच उच्चशिक्षणासाठी पदवीचा उपयोग जीवनात करावा असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना  प्राचार्य डॉ.ढास डी.के. म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या पदवीचा उपयोग समाजासाठी व स्वतःच्या विकासासाठी व्यक्तिमत्व विकास साध्य करण्यासाठी करावा. स्वतःचे हित आणि आपली उच्चविद्याविभूषित पदवी आपल्या जीवनात नवीन बदल घडवण्यास मदत करते. तसेच पालकांनी आपल्या पाल्यास वेळोवेळी महाविद्यालयात उपस्थित राहण्यासाठी प्रवृत्त करावे. विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालयातील नियमित उपक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवावा. असे उद्गार याप्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संघ संयोजक प्रा. मुजावर एस.टी. यांनी केले. तर आभार डॉ. देशमुख आर.के. यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतीसाठी डॉ जाधव एस.एच., प्रा.आंधळे डी.ए., प्रा.बचुटे जी.डी, डॉ.काळे अंकुश आदीनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी  महाविद्यालयातील माजी विद्यार्थी, पालक आणि पदवी घेण्यासाठी उपस्थित विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
error: Content is protected !!