ब्रेकिंग न्युज
पंतप्रधानांच्या रेकॉर्डब्रेक सभेचे यशस्वी नियोजनविकासाच्या नावाखाली फक्त धुळफेक – माजीमंञी सुरेश नवलेपार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे तिथे नीतिमता असणाऱ्या अशोक हिंगेला खासदार म्हणून पाठवा:- प्रकाश आंबेडकर विजयराव औटींनी सांगितले विखेंना पाठिंबा देण्याचे कारण…आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे

सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्याची दुसरी इनिंग – रणवीर पंडित

सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्याची दुसरी इनिंग – रणवीर पंडित

गेवराई दि.२९(प्रतिनिधी;-सेवानिवृत्ती म्हणजे नौकरी नंतर पुन्हा एकदा आयुष्यातील नौकरीच्या कालखंडात व्यस्ततेमुळे राहुन गेलेल्या गोष्टी करण्यासाठी मिळालेली दुसरी इनिंग आहे असे प्रतिपादन शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांनी केले. माध्यमिक विद्यालय, भेंडटाकळी शाळेतील लिपीक गोपीनाथ कोळपे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

माध्यमिक विद्यालय भेंडटाकळी शाळेतील लिपीक गोपीनाथ कोळपे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गेवराई पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव उबाळे, शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन करुन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोळपे सर यांचा सपत्निक पूर्ण आहेर, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी शाळेतील कु. पुजा रामेश्वर लोंढे व ज्ञानेश्वरी उबाळे यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक पालक संघाचे जेष्ठ सदस्य ह. भ. प. महादेव महाराज, ह.भ.प. भानुदास महाराज, सेवानिवृत्त मुख्याध्यापक गंगाधर बोर्डे यांनीही आपले विचार मांडले. गौरव सोहळ्यास उत्तर देताना कोळपे सरांनी आपल्या नौकरी कालखंडातील आठवणींना उजाळा देऊन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अमरसिंह पंडित व शिवछत्र परिवाराचे आपल्यावर प्रचंड उपकार आहेत व आपण सेवानिवृत्त झालो तरी सदैव त्यांच्या ऋणात राहु असेही ते म्हणाले.

याप्रसंगी बोलताना रणवीर पंडित म्हणाले की, कोळपे सर जरी नौकरीतुन सेवानिवृत्त झाले असले तरी शिवछत्र परिवाराचे कायम सदस्य राहातील. नौकरीत कुटुंबाला, घराला, पर्यटनाला वेळ देऊ शकला नसाल तर आता ती कमी भरुन काढत आयुष्याची सेकंड इनिंग दमदार पणे सुरु करण्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोप वसंतराव उबाळे यांनी केला. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष मोहनराव लोंढे माजी सरपंच सोमिनाथ जंगले, शिवदास जंगले, हनुमान उबाळे, महादेव महाराज उबाळे, भानुदास महाराज, दत्तात्रय उबाळे, शिवाजी जंगले, पार्श्वनाथ लोंढे, गणपत नाटकर, जंगले सर, अनिरुद्ध उबाळे, प्रा. राम उबाळे, राहुल गायके, मुक्तार शेख तसेच भेंड, भेंडटाकळी गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, कोळपे सरांचे जावाई संतोषराव जाधव, आई वडील, मुले नौकरी मधील आजीमाजी सहकारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्याध्यापक उदय पाठक यांनी केले तर आभार शाम कुलकर्णी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री सोनवणे सर, पवार सर, पठाण सर, कोरडे सर, गलधर सर, शेख सर, इंद्राळे सर, भारती सर, उगले सर, गायके सर, नारायण राऊत, संदीपान मोटे, बंडु आबुज, शिंदे मामा यांनी परिश्रम घेतले. यावेळी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!