ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

४२ जातींना बरोबर घेऊन जामखेड तालुक्याच राजकारणाला दिशा देणार – ॲड.डॉ.अरुण जाधव

४२ जातींना बरोबर घेऊन जामखेड तालुक्याच राजकारणाला दिशा देणार – ॲड.डॉ.अरुण जाधव
जामखेड प्रतिनिधी;-राजकारणात समाजकारणात काम करण्यासाठी इतर समाजातील लोक आपल्या सोबत असायला पाहिजे, जामखेड तालुक्यात २० हजार भटके विमुक्त व आदिवासी आहेत. तरीही आज भटके विमुक्त समाजाला सत्ताधारी पुढारी किंमत नाही. समाज एकत्र येतोय, ताकद निर्माण होते. निवडणूक झाल्यावर तुम्हाला छपरामध्ये नेऊन ठेवले जाते. पुढारी समाजाचे शोषण, करणारे दिशाभूल करणारे आहे. आपण आपल्या समाजातील कार्यकर्ते पुढारी,नेते तयार करायचे आहे. प्रत्येक जातीच्या माणसाला एकत्र आणून संघटन मजबूत करणे, काळा ची गरज आहे. उद्याचा काळ गुलामीच आहे. संविधानाला नष्ट करण्याचे काम व्यवस्था करत आहे. तुमचे नेतृत्व कोण करणार गावा गाड्या मध्ये काय किंमत आहे. आपण आपल्या माणसासोबत जायचे, त्यांना समजावून सांगायचे त्यांनासोबत घेऊन जायचे. आपलेच काही लोक आपलेच खातात व काम झाल्यानंतर निघून जातात. यापासून आपण ओळखून राहिले पाहिजे. असे बैठकी प्रसंगी एडवोकेट डॉ अरुण जाधव बोलत होते.
दि.११/०४/२०२४ रोजी जामखेड शहरातील कुंभारतळे येथील ग्रामीण विकास केंद्र येथे ४२ जातींची बैठक पार पडली.
पुढे बोलताना अरुण जाधव म्हणाले की,बाबासाहेबांची चळवळ गद्दारांनी मागे नेली आहे. आदिवासींवर अन्याय अत्याचार झाला. तर सर्वांनी तुटून पडायचे सर्वांनी एकत्र येऊन आपली ताकद वाढवायची आहे. भटके विमुक्त व आदिवासी यांच्या ४२ जातीसह महिलांसह एकत्र यायचं घरी बसणाऱ्या माणसाला नेता करू नये. तुम्हाला मदत किंवा किंमत जे देत नाही. त्यांच्यासोबत आपण जायचे नाही. आपण भटके विमुक्त  व आदिवासी सर्व समाजाने जात-पात न पाहता एकत्रित येऊन काम केले पाहिजे.
 भटक्या विमुक्त हे खरे इंग्रजांशी लढले. गुन्हेगारी ठरवले म्हणून ते जंगलात गेले.या  समाजाला राजकीय क्षेत्रात येणे गरजेचे आहे. आपला नेता कोण आहे. त्याला ओळखूनच मतदानाचा बजावला पाहिजे. जो आपल्या सुख दुःखात सहभागी होईल याच्यासोबतच गेले पाहिजेत. असे व्यक्त केले.
बापु ओहळ यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, भटके विमुक्त  व आदिवासी समाजाने शिक्षण घेणे गरजेचे आहे. शिक्षणामुळे चांगले व वाईट समजते. बाबासाहेबांनी कशाप्रकारे शिक्षण घेतले. तशी परिस्थिती आज नाही. मुलांना शिक्षणासाठी सोय होत नसेल, तर निवारा बालगृह जामखेड या ठिकाणी पाठवावे पहिली ते बारावीपर्यंत विनामूल्य शिक्षण दिले जाते. तसेच आपण सुज्ञ नागरिकाला व संविधानाला मानणाऱ्या उमेदवारालाच मतदान केले पाहिजे. संविधानाच्या विरोधात जाऊन बोलत असणाऱ्या उमेदवाराला मतदान देऊ नये. तसेच भटके विमुक्त व आदिवासी या समाजाने संघटन केले पाहिजे. या संघटन मध्ये महिला व पुरुष तसेच तरुण युवकांची फळी निर्माण केली पाहिजेत. जेणेकरून यांना संघटनेमार्फत प्रशिक्षण देऊन शासकीय योजना घेता येईल व अधिकार्‍यांशी बोलता येईल असे. या वेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून आपण सर्व 12 बलुते एकत्र येऊन उद्याची लढाई जिंकूया .
    या वेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. या बैठकीसाठी वैदू समाज नेते बाळासाहेब लोखंडे , आदिवासी नेते विशाल पवार,अजिनाथ शिंदे, नवनाथ जाधव, मच्छिंद्र जाधव,संतोष चव्हाण, अरविंद जाधव,भिमराव चव्हाण, अंकुश पवार,धनराज पवार, सचिन भिंगारदिवे,राहूल पवार, दिपाली काळे, कदीर मदारी, द्वारका पवार, भगवान सुरवसे, ऋषिकेश गायकवाड,राजु शिंदे, अविनाश जाधव, लाला वाळके, आदि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिनाथ शिंदे यांनी केले तर बैठकीचे आभार नवनाथ जाधव यांनी मानले.
error: Content is protected !!