ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

दुष्काळी बीड जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पाऊस आणि वादळाचा बसला तडाखा

धनंजय कुलकर्णी -उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

दुष्काळी बीड जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पाऊस आणि वादळाचा बसला तडाखा

बीड (प्रतिनिधी)दुष्काळी बीड जिल्ह्याला गारपीट, अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा बसला आहे. धारूर तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. कायम दुष्काळी असणाऱ्या या जिल्ह्यात भर उन्हाळ्यात पूर आला आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहात असून शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. वडवणी, धारूर, माजलगाव तालुक्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे.

जवळपास एक ते दीड तास झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने ओढे, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर यामुळं शेतकऱ्यांच्या फळबागांसह पिकांचे देखील आतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान अगोदरच दुष्काळाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांपुढं आता अवकाळी पावसाने नवसंकट उभा केले आहे. हातातोंडाशी आलेला आंबा पीक आता नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. तर कांद्याच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे.त्यामुळे फळबागांसह नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

 

error: Content is protected !!