ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

सामुदायिक नमाज पठण करून ईद – उल -फित्र उत्साहात साजरी

सामुदायिक नमाज पठण करून ईद – उल -फित्र उत्साहात साजरी

गेवराई शहरात ईदगाह मैदानावर सर्व पक्षीय मांदियाळीने आला उत्साह

गेवराई दि. 11 : वार्ताहर : मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असलेला ईद-उल-फित्र [ रमजान ] गुरूवार ता. 11 रोजी शहरातील इदगाह मैदानावर सकाळी 9.30 वाजता सामुदायिक नमाज पठण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुस्लिम धर्मगुरूंच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करून अल्लाह कडे दुवा मागितली. यावेळी सामाजिक, राजकीय कार्यात सक्रिय असलेल्या नेत्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. विशेष बाब म्हणजे, गेवराई च्या ईदगाह मैदानावर पहिल्यांदाच मराठा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने स्वतंत्र पेन्डाल टाकून शुभेच्छा देऊन ईद साजरी करण्यात आली.
गुरूवार ता. 11 रोजी गेवराई च्या ईदगाह मैदानावर सकाळी 9.30 वाजता नमाज पठणाला सुरूवात झाली. अर्धा तासानंतर मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली. 12 मार्च रोजी रमजान चा पहिला उपवास सुरू झाला. 30 रोजे पूर्ण करून, मुस्लिम बांधवांनी अल्लाह चे चिंतन केले. कडक उन्हाळ्यात रोजा महिना आला. त्यामुळे, कडक उपवास झाले. बाजारपेठे गजबलेली पाहयला मिळाली. ईदच्या दिवशी शहरातील विविध भागात ईद चा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
एकमेकांना गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. नगर परिषदेच्या वतीने उभ्या करण्यात आलेल्या पेन्डालमध्ये माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, युवा नेते शिवराज बाळराजे पवार, युवा नेते रणवीर पंडित, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ , जिपचे
माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, माजी सभापती युद्धाजीत पंडित, माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, रिपाई चे किशोर कांडेकर, गेवराई चे तहसीलदार खोमणे , गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी , विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पदाधिकारी, आजी माजी नगरसेवकांनी ईदगाह मैदानावर उपस्थित राहून ईदच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!